कॅलिफोर्निया (अमेरिका) : निसर्गाची किमया अगाध आहे आणि त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे अमेरिकेतील सेक्वोया नॅशनल पार्कमध्ये असलेला जनरल शरमन हा वृक्ष. आकारमानाने (व्हॉल्युम) हा जगातील सर्वात मोठा जिवंत वृक्ष मानला जातो. तसेच त्याचे वय सुमारे 2,200 वर्षे असल्याचे सांगितले जाते.
अशा या शरमन वृक्षाची थक्क करणारी वैशिष्ट्ये :
उंची : 83.8 मीटर (275 फूट) आहे. याची तुलना करायची झाल्यास, न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या (46 मीटर) उंचीपेक्षा हा वृक्ष जवळजवळ दुप्पट उंच आहे. वजन : हा वृक्ष इतका अवजड आहे की केवळ त्याच्या मुख्य खोडाचे वजन 12,70,000 किलो पेक्षा जास्त आहे. हे वजन सुमारे 7 प्रौढ निळ्या देवमाशांच्या वजनाइतके आहे. विस्तार आणि रुंदी : जमिनीलगत या वृक्षाचा व्यास 11.1 मीटर (36.5 फूट) आहे. सर्वात मोठी फांदी : या वृक्षाच्या एका फांदीचा व्यास चक्क 2.2 मीटर आहे, जो अनेक सामान्य झाडांच्या खोडापेक्षाही मोठा आहे.
वय : सुमारे 2,200 वर्षे आहे. याचा अर्थ असा की, जेव्हा जगात रोमन साम्राज्याची (ख्रिस्तपूर्व 27) सुरुवातही झाली नव्हती, तेव्हापासून हे झाड पृथ्वीवर अस्तित्वात आहे.