विश्वसंचार

First Swimming Pool World | जगातील पहिला इनडोअर स्विमिंग पूल

पुढारी वृत्तसेवा

लंडन : आजच्या काळात अनेक घरांमध्ये किंवा आधुनिक क्लब्समध्ये इनडोअर स्विमिंग पूल असणे सामान्य मानले जाते. परंतु, जगातील पहिल्या आधुनिक इनडोअर स्विमिंग पूलची सुरुवात तब्बल २८४ वर्षांपूर्वी झाली होती, हे तुम्हाला माहिती आहे का? २८ मे १७४२ रोजी लंडनमधील गुडमॅन्स फील्डस्‌ येथील लेमन स्ट्रीटवर ‌‘द बॅगनिओ‌’ नावाचा जगातील पहिला आधुनिक इनडोअर स्विमिंग पूल सुरू करण्यात आला होता.

अठराव्या शतकात लंडनमधील प्रसिद्ध थेम्स नदी प्रचंड प्रदूषित झाली होती. या प्रदूषित नदीत पोहणे आरोग्यासाठी घातक बनले होते. यावर एक सुरक्षित आणि खासगी पर्याय म्हणून ‌‘द बॅगनिओ‌’ची निर्मिती करण्यात आली. नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात पोहण्याचा आनंद घेता यावा, हा यामागील मुख्य उद्देश होता. हा स्विमिंग पूल त्या काळी अत्यंत उच्चभ्रू आणि विशेष मानला जात असे. येथे येणाऱ्या सदस्यांसाठी केवळ स्वच्छ पाण्याचीच सोय नव्हती, तर पोहणे शिकवण्यासाठी खास ‌‘ऑन-साईट स्विमिंग ट्रेनर्स‌’ (प्रशिक्षक) देखील उपलब्ध करून देण्यात आले होते. तत्कालीन समाजातील प्रतिष्ठित लोकांसाठी हे एक आकर्षणाचे केंद्र बनले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT