Hydrogen Hypersonic Jet | हायड्रोजन इंधनावरील जगातील पहिले हायपरसोनिक जेट 
विश्वसंचार

Hydrogen Hypersonic Jet | हायड्रोजन इंधनावरील जगातील पहिले हायपरसोनिक जेट

पुढारी वृत्तसेवा

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियन कॅपनी हायपरसोनिक्स लाँच सिस्टम्स एक जेट विकसित करत आहे. हे जगातील पहिले हायड्रोजन-इंधनयुक्त हायपरसोनिक जेट असेल, जे मॅक 12 किंवा ध्वनीच्या 12 पट वेगाने उड्डाण करण्यास सक्षम असेल. त्याचा वेग ताशी 14,815 किलोमीटर इतका प्रचंड असेल. हे जेट पुन्हा वापरता येईल. ब्रिस्बेनस्थित या कंपनीला अलीकडेच 46 दशलक्ष डॉवरचा निधी मिळाला आहे. ही गुंतवणूक ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय पुनर्रचना निधी महामंडळ, क्विन्सलँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन आणि अनेक आंतरराष्ट्रीय संरक्षण गुंतवणूकदारांनी केली आहे.

या निधीचा उद्देश ऑस्ट्रेलियाला हायपरसोनिक फ्लाईट आणि एरोस्पेस उत्पादनात एक पॉवरहाऊस बनवते. हायपरसोनिक्समध्ये सध्या 45 अभियंते आणि शास्त्रज्ञ कार्यरत आहेत. ही गुंतवणूक त्यांच्या ध्येयावरील विश्वास दर्शवते, असे सीईओ मॅट हिल म्हणाले. एनआरएफसीची संरक्षण क्षेत्रातील पहिली मोठी गुंतवणूक आहे. सीईओ डेव्हिड गॅल म्हणाले, ‘संरक्षण हे आमचे प्राधान्य आहे. आम्हाला ऑस्ट्रेलियन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करायची आहे जे देशाच्या स्वतःच्या तांत्रिक क्षमता वाढवतील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रासंगिक असतील.’

हे स्पार्टन स्क्रॅमजेट आहे, जे पूर्णपणे थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून बनवले आहे. त्यात कोणतेही हलणारे भाग नाहीत आणि ते हिरव्या हायड्रोजनवर चालते. याचा अर्थ ते शून्य-कार्बन इंजिन असेल. हे इंजिन जेटला ध्वनीच्या वेगापेक्षा 12 पट वेगाने उड्डाण करण्यास सक्षम करेल. हायपरसोनिक्सचे सह-संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॉ. मायकल स्मार्ट, जे पूर्वी नासाचे शास्त्रज्ञ होते, म्हणाले की स्पार्टन हे केवळ एक इंजिन नाही तर उड्डाणाचे भविष्य आहे. त्यांनी सांगितले की, ही प्रणाली पर्यावरणपूरक, किफायतशीर आणि पुन्हा वापरता येण्याजोगी आहे. हायपरसोनिक्सचे सहसंस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॉ. मायकल स्मार्ट, जे पूर्वी नासाचे शास्त्रज्ञ होते. ते म्हणाले की, स्पार्टन हे केवळ एक इंजिन नाही तर उड्डाणाचे भविष्य आहे. त्यांनी सांगितले की, ही प्रणाली पर्यावरणपूरक, किफायतशीर आणि पुन्हा वापरता येण्याजोगी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT