नवी दिल्ली : विषारी साप आणि बिनविषारी साप याबद्दल नेहमीच चर्चा होत असते. एखाद्याला साप चावला म्हणजेच सापाने दंश केला तर तो विषारी आहे की बिनविषारी यावर पुढील उपचार ठरतो. मात्र, सापांच्या या दुनियेवर संशोधक नेहमीच लक्ष ठेवून असतात. नुकताच विषारी नव्हे तर सर्वात जलद, वेगाने हल्ला करणार्या विषारी सापांवरही अभ्यास सुरू आहे.
संशोधकांच्या मते, सर्वात जलद हल्ला करणारे विषारी साप हे प्रामुख्याने व्हायपर्स वर्गातील असतात. नवीन विश्लेषणानुसार, 36 विषारी सापांच्या तुलनेत व्हायपर्सचा हल्ला सर्वात वेगवान आढळला. सापटर्सिओपेलो व्हायपर हा साप जगातील सर्वात वेगवान, जलद हल्ला करणारा विषारी साप ठरला आहे. त्याचा सरासरी कमाल वेग 3.5 मीटर प्रति सेकंद आहे. पूर्व मेक्सिकोपासून दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील भागात हा व्हायपर आढळतो आणि तो सस्तन प्राणी आणि पक्ष्यांची शिकार करतो.
इतर वेगवान व्हायपर्सया अभ्यासात इतरही अनेक व्हायपर्सनी 3.3 मीटर प्रतिसेकंदहून अधिक कमाल वेग नोंदवला. त्यामध्ये हॉर्नड पिट व्हायपर, ब्लंट-नोस्ड व्हायपर या सापांचा समावेश आहे. हे व्हायपर्स हे सहसा दबा धरून बसतात आणि मग हल्ला किंवा शिकार करतात. सस्तन प्राण्यांना व्हायपरने केलेल्या हल्ल्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी साधारणपणे 60 ते 400 मिलीसेकंद लागतात. त्यामुळे शिकार पकडण्यासाठी व्हायपर्सला जास्तीत जास्त वेगवान हल्ला करणे आवश्यक असते.
मोठे साप त्यांच्या जास्त स्नायूंमुळे अधिक वेगाने हल्ला करतात. इतर कुटुंबातील सापांचा वेगव्हायपर्सच्या तुलनेत इतर कुटुंबातील विषारी सापांचा वेग कमी असतो; परंतु काही साप संथ व्हायपर्सच्या वेगाशी जुळणारे असतात. व्हायपर टर्सिओपेलो, रफ-स्केल्ड डेथ अॅडर, ईस्टर्न रॉक रॅटलस्नेक, मँग्रोव्ह स्नेक हे साप जलद, गुळगुळीत हल्ला करून विष सोडतात आणि शिकार करतात. तर कोब्रा वर्गात समाविष्ट असलेले एलापिडस् साप शिकार चावून, पकडून ठेवतात आणि वारंवार दंश करतात.