World most expensive diamond | जगातील सर्वात महागडा गुलाबी हिरा 
विश्वसंचार

World most expensive diamond | जगातील सर्वात महागडा गुलाबी हिरा

पुढारी वृत्तसेवा

हाँगकाँग : रत्नांच्या दुनियेत ‘गुलाबी हिरा’ हा नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिला आहे. ‘विल्यमसन पिंक स्टार’ या गुलाबी हिर्‍याला ‘जगातील सर्वात महागडा गुलाबी हिरा’ म्हटले जाते. एका लिलावात हा हिरा तब्बल 477 कोटी रुपयांना विकला गेला. प्रतिकॅरेट किमतीच्या बाबतीत याने जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

हा हिरा 11.15 कॅरेटचा असून, तो ‘कुशन कट’ आकारात पैलू पाडलेला आहे. या हिर्‍याचा रंग ‘फॅन्सी विव्हिड पिंक’ आहे, जो गुलाबी हिर्‍यांमधील सर्वात उच्च दर्जा मानला जातो. हा हिरा पूर्णपणे ‘इंटरनली फ्लॉलेस’ म्हणजेच आतून अत्यंत पारदर्शक आहे. निसर्गात गुलाबी हिरे मिळण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यातही 10 कॅरेटपेक्षा जास्त वजनाचे आणि गडद गुलाबी रंगाचे हिरे मिळणे ही अत्यंत दुर्मीळ घटना आहे. ‘सॉथबी’ या प्रसिद्ध लिलाव संस्थेने हाँगकाँगमध्ये या हिर्‍याचा लिलाव आयोजित केला होता.

सुरुवातीला या हिर्‍याची किंमत साधारणत: 180 ते 200 कोटी रुपयांच्या आसपास असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, जगभरातील श्रीमंत बोलीधारकांमध्ये लागलेल्या चुरशीमुळे या हिर्‍याने अपेक्षेपेक्षा दुप्पट किंमत मिळवली. याआधी ‘सीटीएफ पिंक स्टार’ या 59.60 कॅरेटच्या हिर्‍याने 2017 मध्ये सर्वाधिक किमतीचा विक्रम केला होता. मात्र, ‘विल्यमसन पिंक स्टार’ने प्रतिकॅरेट 5 दशलक्ष डॉलर्सचा टप्पा ओलांडून नवा विक्रम नोंदवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT