नवी दिल्ली ः चपाती म्हणजे रोटी हा अशा पदार्थ जी संपूर्ण भारतात एक सारखीच बनवली जाते. आकारदेखील साधारणपणे सारखाच असतो; पण याच भारतात एका ठिकाणी जगातील सर्वात मोठी चपाती बनवली जाते.
भारतात असे एक ठिकाण आहे जिथे, जगातील सर्वात मोठी चपाती बनविली जाते. या चपातीचा आकार एवढा मोठा आहे की, या चपातीमुळे एखाद्या संपूर्ण गावाचे पोट भरेल. जगातील सर्वात मोठी चपाती कुठे बनवली जाते जाणून घ्या.
जगातील सर्वात मोठी चपाती गुजरात राज्यातील जामनगरमध्ये बनवली जाते. मात्र, ही भलीमोठी चपाती रोज बनवली जात नाही. काही खास प्रसंगीवेळीच ही खास चपाती बनवली जाती. जलाराम मंदिराच्या जीर्णोद्धार समितीतर्फे ही खास चपाती बनवली जाते. त्यानंतर मंदिरात दर्शनासाठी येणार्या भाविकांनी ही चपातील प्रसाद म्हणून वाटली जाते. या दिवशी ही खास चपाती खाण्यासाठी लोक दूरदूरहून जामनगरला भेट देतात आणि या चपातीचा आस्वाद घेतात.
ही चपाती बनविण्यासाठी एक-दोन नव्हे तर अनेक जणांना मेहनत घ्यावी लागते. अनेक महिला एकत्र मिळून ही जगातील सर्वात मोठी चपाती बनवतात. एवढंच नाही तर सुमारे तासाभराच्या मेहनतीनंतर ही चपाती तयार होते. ही चपाती बनविण्यासाठी भरपूर प्रमाणात गव्हाचे पीठ वापरले जाते. ही चपाती तयार झाल्यावर त्याचे वजन 145 किलोपर्यंत असते.
आता एवढी मोठी चपाती भाजण्यासाठीही तेवढ्याच आकाराचा तवा लागणार... ही चपाती भाजण्यासाठी मंदिराजवळच एक खास मोठा तवा आहे. या तव्यावर ही खास चपाती भाजली जाते. चपाती भाजण्यासाठीही अनेकांना काम करावे लागते आणि चपाती जळू नये, म्हणून तव्याखालील आच मंद ठेवली जाते.