Robotic medical system Pudhari
विश्वसंचार

Robotic medical system: जगातील पहिली रोबो मेडिकल सिस्टीम लाँच

आता डॉक्टर, रोबो एकत्र करणार उपचार

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : विज्ञानाने वैद्यकीय क्षेत्रात एक मोठे पाऊल उचलले आहे. स्टॅनफोर्ड आणि प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी ‌‘चशवजड‌’ नावाची जगातील पहिली रोबो मेडिकल सिस्टीम विकसित केली आहे. ‌‘मेडोस‌’ ही प्रणाली सध्या अमेरिकेतील स्टॅनफोर्ड ब्लड सेंटर आणि पॅथॉलॉजी विभागात डॉक्टरांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे विमानात वैमानिकाला मदत करण्यासाठी एक ‌‘को-पायलट‌’ असतो, अगदी त्याचप्रमाणे ‌‘मेडोस‌’ डॉक्टरांसाठी सहायक म्हणून काम करत आहे.

‌‘मेडोस‌’ची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचे मल्टी एजंट एआय सिस्टीम. यात तीन स्तरांवर काम चालते. 1. लक्षणे तपासणे : पहिला एआय एजंट रुग्णाची लक्षणे (उदा. ताप, खोकला) तपासून त्याचे विश्लेषण करतो. 2. अहवालांचे वाचन : दुसरा एआय एजंट रुग्णाचे जुने वैद्यकीय अहवाल आणि चाचण्यांचा अभ्यास करतो. 3. उपचारांचा सल्ला : तिसरा एआय एजंट या माहितीच्या आधारे डॉक्टरांना कोणती औषधे किंवा चाचण्या योग्य ठरतील, याची शिफारस करतो. यामुळे उपचारांचा निर्णय जलद आणि अचूक घेणे शक्य होते. या तंत्रज्ञानाचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे दठ (एुींशपवशव ठशरश्रळूीं) स्मार्ट ग्लासेस.

डॉक्टर जेव्हा हा चष्मा घालतात, तेव्हा त्यांना रुग्णाच्या शरीराचा 3डी मॉडेल किंवा रक्ताचे अहवाल थेट आपल्या डोळ्यांसमोर दिसतात. जसे मोबाईलमध्ये आपण एआर फिल्टर्स वापरतो, तसेच डॉक्टरांना रुग्णाच्या शरीरांतर्गत नेमकी काय स्थिती आहे, हे चष्म्यातून स्पष्ट दिसते. ‌‘मेडोस‌’मध्ये ‌‘कोबॉट‌’ (उेश्रश्ररलेीरींर्ळींश ठेलेीं) आणि इंटेलिजेंट ग्लोव्हजचा वापर केला जातो. कोबॉट : हा रोबो शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना मदत करतो. जर ऑपरेशन करताना डॉक्टरांचा हात थोडा थरथरला, तर रोबो त्याला स्थिर ठेवण्यास मदत करतो.

स्मार्ट ग्लोव्हज : डॉक्टरांच्या हातातील हा ग्लोव्ह हाताच्या सूक्ष्म हालचाली पकडून रोबोला सूचना देतो, ज्यामुळे सुई टोचणे किंवा शस्त्रक्रिया करणे अत्यंत अचूक होते. सध्या ‌‘मेडोस‌’चा वापर प्रामुख्याने ब्लड टेस्ट आणि पॅथॉलॉजीमध्ये केला जात आहे. संशोधकांच्या मते, यामुळे कामाच्या तणावाखाली असलेले डॉक्टर, नर्स आणि मेडिकलचे विद्यार्थी अधिक अचूकपणे काम करू शकतील. भविष्यात हे तंत्रज्ञान विकसित झाल्यास दुर्गम भागातील छोट्या रुग्णालयांमध्येही अत्याधुनिक उपचार मिळणे सुलभ होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT