विश्वसंचार

‘तिची’ झोप कुंभकर्णासारखी; दोन-दोन आठवडे तीची मोडत नाही

Arun Patil

वॉशिंग्टन : सलग 6 महिने झोपी जाऊ शकणार्‍या कुंभकर्णाबाबत आपण सर्वांनीच ऐकलेले असते. वरदानामुळे एकदा झोपल्यानंतर त्याची झोप अजिबात मोडत नव्हशकते!ती. आता ही गोष्ट पुराणातली. पण, आधुनिक युगात अमेरिकेत एक महिला अशीही आहे, जी 10-12 तास नव्हे, तर चक्क दोन-दोन आठवडे सलग झोपून राहू शकते!

मागे एकदा तर ती झोपेच्या नादात आपला वाढदिवसच विसरली. तिचे निकटवर्तीय त्यावेळी घरी पोहोचले; मात्र तिला जागच आली नाही. आता ही झोप सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे अजिबात नाही. उलटपक्षी, 'स्लीपिंग ब्युटी सिन्ड्रोम' या आजाराने तिला ग्रासलेले आहे आणि या आजारामुळेच ती सातत्याने झोपून असते.

या 24 वर्षीय महिलेचे नाव बेला अ‍ॅर्न्ड्यू असे आहे. बेला नर्स म्हणून काम करते. पण, या आजारामुळे तिला छोट्या-मोठ्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. 2016 मध्ये तिच्या या आजाराची सुुरुवात झाली. त्यावेळी एका पार्टीमधून परत आल्यानंतर ती झोपी गेली आणि चक्क पुढील 10 दिवस तिला अजिबात जाग आली नाही! काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्येही दियाझ नावाच्या 21 वर्षीय युवतीला याच आजाराने ग्रासले असल्याचे आढळून आले होते. दियाझ एकदा सलग तीन आठवडे झोपून राहिली आणि यादरम्यान ती पदवीच्या परीक्षेला देखील बसू शकली नव्हती. डॉक्टरांनुसार, हा न्यूरॉलॉजिकल आजार असून, वाढत्या वयानुसार या आजाराचा प्रभाव कमी होत जातो.

SCROLL FOR NEXT