नवी दिल्ली : वैद्यकीय विज्ञानात डॉक्टरांनी एक अभूतपूर्व यश संपादन केले आहे. ‘एशरमन सिंड्रोम’ या गंभीर समस्येशी झुंज देणाऱ्या एका महिलेने ‘अम्बिलिकल कॉर्ड स्टेम सेल थेरपी’च्या मदतीने एका निरोगी बाळाला जन्म दिला आहे. ज्या महिलांची आई होण्याची शक्यता अत्यंत कमी होती, त्यांच्यासाठी हे तंत्रज्ञान एक मोठी आशा बनून आले आहे.
प्रसिद्ध गायनेकोलॉजिस्ट आणि आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. अर्चना धवन बजाज यांच्या मते, एशरमन सिंड्रोममध्ये गर्भाशयाच्या आत असामान्य तंतूमय ऊती (डलरी ढर्ळीीीशी) तयार होतात. यामुळे गर्भाशयाचा आतील थर (णींशीळपश ङळपळपस) पूर्णपणे विकसित होऊ शकत नाही. परिणामी गर्भधारणेत वारंवार अडथळे येतात. या प्रक्रियेत गर्भनाल (णालळश्रळलरश्र उेीव) मधून घेतलेल्या स्टेम सेल्सचा वापर केला जातो. स्टेम सेल्सच्या मदतीने गर्भाशयातील खराब झालेल्या ऊतींची दुरुस्ती केली जाते. नाळेतील ऊतींमुळे गर्भाशयाचा खराब झालेला थर पुन्हा निरोगी आणि विकसित होतो, ज्यामुळे गर्भधारणेसाठी पोषक वातावरण तयार होते.
यापूर्वी या समस्येवर शस्त्रक्रिया किंवा हार्मोन थेरपी केली जात असे. परंतु गंभीर प्रकरणांमध्ये त्याचा फारसा उपयोग होत नव्हता. आता स्टेम सेल थेरपीने नवीन मार्ग खुला केला आहे. डॉ. अर्चना धवन बजाज यांनी स्पष्ट केले की, स्टेम सेल थेरपीचा वापर सध्या विविध आजारांवर केला जात आहे, परंतु प्रजनन क्षमतेच्या बाबतीत याचा वापर क्रांती घडवणारा ठरत आहे. विशेषतः गर्भाशयाशी संबंधित गंभीर समस्या असलेल्या महिलांसाठी ही थेरपी एक आशेचा किरण आहे. लांबलचक उपचारांनंतरही अपत्यप्राप्ती न झालेल्या दाम्पत्यांसाठी ही ‘स्टेम सेल तंत्रज्ञान’ पद्धती भविष्यात अत्यंत प्रभावी ठरणार आहे.