हिवाळ्यात बदाम-अंजीरचे सेवन ठरते लाभदायक  (Pudhari File Photo)
विश्वसंचार

Winter Health Tips | हिवाळ्यात बदाम-अंजीरचे सेवन ठरते लाभदायक

हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवणार्‍या पदार्थांचे सेवन लाभदायक ठरत असते. यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुका मेवा हे सर्वोत्तम स्रोत मानले जातात.

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवणार्‍या पदार्थांचे सेवन लाभदायक ठरत असते. यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुका मेवा हे सर्वोत्तम स्रोत मानले जातात. मनुका, बदाम, अंजीर आणि खजूर यांसारखा सुका मेवा यासाठी गुणकारी आहे. हे सर्व नट्स त्यांच्या पौष्टिकतेसाठी आणि वेगवेगळ्या फायद्यांसाठी ओळखले जातात. मात्र जेव्हा शरीराला उबदार ठेवण्याचा विचार येतो, तेव्हा बदाम आणि अंजीर हे सर्वोत्तम पर्याय मानले जातात. मात्र काही लोकं हिवाळ्यात रिकाम्या पोटी बदाम की अंजीर खाणे जास्त फायदेशीर आहे, यामध्ये संभ्रमात असतात. आता तज्ज्ञांनी याबाबतची माहिती दिली आहे.

अंजीर हे एक पौष्टिक फळ आहे आणि ते लोहाचा एक उत्कृष्ट स्रोत मानले जाते. त्यात फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, बी जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सदेखील असतात. अंजीरमध्ये उष्णता निर्माण करणारा प्रभाव असतो, ज्यामुळे ते हिवाळ्यात खाण्यासाठी सर्वोत्तम बनतात. अशक्तपणाने ग्रस्त असलेल्यांसाठी अंजीर खाणे खूप फायदेशीर ठरू शकते. ते दररोज खाल्ल्याने पचन सुधारते, अशक्तपणा कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते. बदाम हे फायबरचा एक उत्तम स्रोत मानले जातात. बदाम दररोज खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत होण्यास मदत होते. कारण यात निरोगी फॅट, व्हिटॅमिन ई, प्रथिने, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्सदेखील असतात. फायबरमध्ये समृद्ध असल्याने बदाम तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करतात, वारंवार भूक लागणे टाळतात आणि तुमचे वजन नियंत्रित करण्यास मदत करतात.

तज्ज्ञ सांगतात की, बदाम आणि अंजीर हे दोन्ही उष्ण प्रकृतीचे नट्स आहेत. यासाठी ते हिवाळ्यात खाण्यासाठी लाभदायक मानले जातात. मात्र त्यांचे पौष्टिकता मूल्य वेगळेवेगळे आहेत. जसे की, बदाम हे फायबरचे एक उत्तम स्रोत आहेत, तर अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते, ऊर्जा वाढते आणि वजन नियंत्रित होण्यास मदत होते. अंजीर अशक्तपणा कमी करण्यास, बद्धकोष्ठता दूर करण्यास आणि श्वसन प्रणाली मजबूत करण्यास देखील मदत करतात. हिवाळ्यातील गरजांनुसार तुम्ही यापैकी कोणताही एक नट्स निवडू शकता.

तज्ज्ञ सांगतात की, जर तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी बदाम किंवा अंजीर खायचे असतील, तर ते रात्रभर भिजवून खा. तुम्ही बदाम सोलून संपूर्ण खाऊ शकता. अंजीर कच्चे खाऊ शकता. तुम्ही 4-5 बदाम आणि 2 अंजीर खाऊ शकता. सकाळी त्यांचे सेवन केल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीराला उबदारपणा आणि शक्ती मिळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT