AI Impact on Education | ‘एआय’मुळे दहा वर्षांत बंद होतील कॉलेज? 
विश्वसंचार

AI Impact on Education | ‘एआय’मुळे दहा वर्षांत बंद होतील कॉलेज?

‘गुगल एक्स’च्या माजी मुख्य अधिकाऱ्याची मोठी भविष्यवाणी

पुढारी वृत्तसेवा

सिलिकॉन व्हॅली : आजच्या काळात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने (एआय) विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या आणि अभ्यासाच्या पद्धतीमध्ये क्रांती घडवून आणली आहे. करिअर समृद्ध करण्यासाठी आणि नवीन तंत्रज्ञानाशी जोडले जाण्यासाठी विद्यार्थी एआय स्किल्स शिकण्यावर भर देत आहेत. याचदरम्यान ‘गुगल एक्स’चे माजी चीफ बिझनेस ऑफिसर मो गौदत (Mo Gawdat) यांनी केलेली एक भविष्यवाणी शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडवून देत आहे. त्यांच्या मते, एआय पारंपरिक कॉलेज मॉडेल अशा प्रकारे बदलेल की येत्या काही वर्षांत कॉलेजला जाण्याची गरजच उरणार नाही!

‘सिलिकॉन व्हॅली गर्ल’ या पॉडकास्टमध्ये बोलताना मो गौदत यांनी हा दावा केला. पालकांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी कॉलेजमध्ये पाठवायला हवे का, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘‘अजिबात नाही. पुढील १० वर्षांत कॉलेज नावाची कोणतीही गोष्ट उरणार नाही, हे १०० टक्के निश्चित आहे.’’ गौदत यांनी एआयच्या प्रभावाची तुलना थेट कॅल्क्युलेटरच्या शोधाशी केली. ज्याप्रमाणे कॅल्क्युलेटर आल्यामुळे विद्यार्थ्यांना कठीण आणि लांबलचक गणितांच्या आकडेमोडीतून मुक्ती मिळाली आणि त्यांचा वेळ इतर महत्त्वाच्या विषयांमध्ये वापरता आला, अगदी तसाच क्रांतीकारक बदल एआय शिक्षण क्षेत्रात घडवून आणेल.

या तंत्रज्ञानाचे फायदे सांगण्यासोबतच गौदत यांनी एक गंभीर इशाराही दिला आहे. अंधाधुंदपणे एआयवर अवलंबून राहिल्याने माणसाची विचार करण्याची क्षमता कमजोर होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला. ते म्हणाले, ‘‘तुम्ही तुमच्या समस्या सोडवण्याचे काम पूर्णपणे एआयवर सोडले, तर हे तंत्रज्ञान तुम्हाला मूर्ख बनवेल.’’ विद्यार्थ्यांनी एआयचा वापर फक्त अशाच कामांसाठी केला पाहिजे जी कामे मशिन माणसांपेक्षा वेगाने आणि चांगल्या प्रकारे करू शकतात; जसे की प्रचंड मोठ्या डेटाचे विश्लेषण करणे किंवा एकाच वेळी अनेक सर्च रिझल्ट्स शोधणे, असा सल्ला त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT