लंडन : काही संशोधन आणि वृत्तानुसार, दक्षिण पूर्वेतील (आग्नेय आशिया) एक बेट तिमोर लेस्ते येथील स्त्री-पुरुषांची उंची ही सरासरीपेक्षा कमी आढळते. ती जगातील मानवाच्या उंचीपेक्षा कमी आहे. अर्थात जेनेटिक्स, पोषण आहार आणि कोणत्या स्थितीत ही माणसं राहतात त्याआधारे प्रत्येक माणसाच्या उंचीत कमी अधिक प्रमाण दिसून येते; पण तिमोर लेस्ते येथील लोकसंख्या जागतिक प्रमाणाच्या तुलनेत कमी उंचीची आहे. त्यामागे काय कारणं आहेत, यावर संशोधन सुरू आहे.
तिमोर लेस्ते या बेटावरील स्त्री आणि पुरुषांची उंची अत्यंत कमी आहे. सरासरी जी उंची आहे, त्यापेक्षा येथील माणसाची उंची कमी आढळून आली. पुरुषांची सरासरी उंची जवळपास 159.8 सेंटिमीटर (5 फूट 2.9 इंच) आहे, तर महिलांची सरासरी उंची जवळपास 151.2 सेंटिमीटर म्हणजे जवळपास 4 फूट 11.5 इंच आहे. हा आकडा जागतिक उंचीच्या सरासरीपेक्षा कमी मानला जातो. तिमोर लेस्ते हा काही कमी उंचीचा एकमेव देश नाही. जागतिक आकडेवारीनुसार, इतर देशांतील स्त्री-पुरुषाची उंची कमी आहे.
लाओस येथील पुरुषाची उंची जवळपास 160.5 सेंटिमीटर आहे. तर महिलांची सरासरी उंची 151.3 सेंटिमीटर आहे, तर मादागास्कर या देशातील पुरुषांची सरासरी उंची जवळपास 161.5 सेंटिमीटर आणि महिलांची उंची जवळपास 151.2 सेंटिमीटर असते. या देशांशिवाय ग्वाटेमाला येथील महिला या जगात कमी उंचीच्या मानल्या जातात. त्यांची सरासरी उंची जवळपास 149.4 सेंटिमीटर असते. तर फिलिपाईन्समधील पुरुषांची सरासरी उंची जवळपास 163.2 सेंटिमीटर आणि महिलांची उंची सरासरी 149.6 सेंटिमीटर इतकी असते. तज्ज्ञांच्या मते, या देशात सरासरी उंची कमी होण्याचे प्रमुख कारण हे अनुवांशिक मानले जाते. तर योग्य पोषण आहार न मिळणे, काही कमी पोषक तत्व न मिळणए यामुळे एखाद्या भागातील स्त्री आणि पुरुषांचा शारिरीक विकास होत नाही. त्या भागातील आरोग्य आणि विकास यामुळे पण मनुष्याची उंची खुंटते असे मानले जाते.