नवी दिल्ली ः तुम्ही नवजात बाळाचे रडणे ऐकले असेल. नवजात बाळाच्या रडण्याला काय म्हणतात आणि त्याचा अर्थ काय हे तुम्हाला माहिती आहे का? नक्कीच 100 पैकी 99 लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहीत नसेल. जर तुम्हालाही उत्तर माहीत नसेल, तर काळजी करू नका... आम्ही तुम्हाला याबाबत सांगणार आहोत.
जन्मानंतर लगेच बाळाच्या रडण्याला ‘वॅगिटस्’ म्हणतात. जन्मानंतर लगेचच बाळाचे हे पहिले रडणे असते. जन्मानंतर लगेच बाळाचे रडणे हे दर्शवते की त्याची फुफ्फुसे योग्यरीत्या कार्य करत आहेत आणि बाळ निरोगी जन्माला आले आहे. बाळ जन्माला आल्यावर त्याचे पहिले रडणे ही त्याच्या स्वतंत्र श्वसन प्रक्रियेची सुरुवात असते. वैद्यकीय शास्त्रात या पहिल्या आवाजाला ‘वॅगिटस्’ (तरसर्ळीीीं) म्हणतात. वॅगिटस्ला बोलीभाषेत रडणे, बाळाची पहिली आरोळी म्हणतात आणि ते मुलाच्या आयुष्याची सुरुवात दर्शवते. जेव्हा एखादे सुदृढ बाळ कोणत्याही उघड कारणाशिवाय (भूक किंवा ओलेपणा नसतानाही) तासनतास जोरात रडते, तेव्हा त्याला वैद्यकीय भाषेत ‘कोलिक’ किंवा ‘पोटशूळ’ असे म्हणतात. हे सहसा वयाच्या 6 आठवड्यांच्या आसपास शिगेला पोहोचते. 2 आठवडे ते 3-4 महिन्यांच्या रडण्याच्या अवस्थेला ‘पर्पल क्राईंग’ म्हणतात. नवजात बाळाचे रडणे हे अनेक गोष्टींचे संकेत देत असल्याने हे रडणेही महत्त्वाचे असते!