विश्वसंचार

मीठ हे नेहमी हात उंच करून का टाकले जाते? जाणून घ्या काय आहे कारण

backup backup

नवी दिल्ली :  कितीही चांगला खाद्यपदार्थ केला असला तरी मिठाशिवाय त्याला चव येत नाही. चिमुटभर का होईना मीठ पदार्थांना चव देते, नाही तर ते अळणी होऊन जाते. अनेक शेफ अशा पदार्थांच्या रेसिपी करून दाखवत असतात. त्यामध्ये ते हात उंच करून मीठ टाकत असताना आपण पाहत असतो. ते असे का करतात याची कल्पना आहे का?

टी.व्ही.वर, यूट्यूबवर किंवा प्रत्यक्षातही शेफ मंडळी असे करीत असताना आपण पाहत असतो. ते मीठ, मसाले किंवा कोणतेही 'सिझनिंग' करीत असताना ठराविक उंचीवर हात धरून करतात. अर्थात ती त्यांची स्टाईल किंवा व्हिडीओत चांगले दिसण्यासाठी नसते. यामागेही एक शास्त्रीय कारण आहे. शेफ नेहमी उंचावरून म्हणजेच साधारणपणे 10 ते 12 इंचांवरून मीठ टाकतात. त्यावेळी ते मीठ पदार्थात एकसमान पसरले जाते. याचा अर्थ पदार्थात पडल्यावर मीठ किंवा मसाला मोठ्या क्षेत्रात विखुरला जातो. त्यामुळे आपोआप त्या पदार्थात मीठ-मसाले एकसमान मिसळून पदार्थ अधिक चवदार बनतो. केवळ चमच्याने हलवून ते मिसळण्यापेक्षा तो आधीच व्यवस्थित मिसळला गेला तर पदार्थांमध्ये आतपर्यंत जातो व चांगली चव येते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT