Empty Room Echo | रिकाम्या खोलीत बोलल्यावर आवाज का घुमतो?  
विश्वसंचार

Empty Room Echo | रिकाम्या खोलीत बोलल्यावर आवाज का घुमतो?

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : कधी कधी आपण दैनंदिन जीवनात काही घटना पाहतो, काही गोष्टी अनुभवतो, पण त्यामागचे कारण जाणून घेत नाही. दिवाळीपूर्वी अनेक लोक ज्यावेळी घराची स्वच्छता करीत असतात, त्यावेळी खोली पूर्ण रिकामीही करतात. नवे घर असेल त्यावेळीही खोली पूर्ण मोकळीच असते व नंतर आपण तिथे फर्निचर वगैरे ठेवतो. जेव्हा आपण रिकाम्या खोलीत बोलतो, तेव्हा आपल्या आवाजाच्या ध्वनीलहरी भिंती, छत आणि जमिनीवर आदळून पुन्हा परत येतात. त्यामुळे आवाज घुमल्यासारखा जाणवतो. हे का घडते ठावूक आहे का?

घरात सोफा, पडदे, गालिचे, उशा यांसारख्या वस्तू आवाज शोषून घेतात. मात्र, रिकाम्या खोलीत अशा वस्तू नसल्यामुळे ध्वनीलहरींचे परावर्तन जास्त होते. आवाज ऐकल्यानंतर तो किमान ०.१ सेकंदांनी पुन्हा ऐकू आला, तर त्याला प्रतिध्वनी (Echo) म्हणतात. मात्र, लहान रिकाम्या खोल्यांमध्ये आवाज लगेच परत येत असल्यामुळे निनाद (Reverberation) निर्माण होतो. भिंतींवरून परत येणाऱ्या ध्वनीलहरी मूळ आवाजात मिसळतात. काही लहरी एकमेकांना बळ देतात, त्यामुळे आवाज अधिक मोठा, घुमणारा किंवा वेगळा ऐकू येतो. खोलीत सोफा, खुर्च्या, पडदे आणि गालिचे ठेवल्यामुळे ध्वनीलहरी शोषल्या जातात आणि त्यांचे परावर्तन कमी होते. त्यामुळे आवाजाचा घुमणारा प्रभाव कमी होऊन खोलीतील आवाज नैसर्गिक वाटू लागतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT