विश्वसंचार

घड्याळाचे काटे फिरताना टिकटिक आवाज का येतो?

Arun Patil

कॅलिफोर्निया : कालानुरूप घड्याळाने देखील बरीच कात टाकली आहे. लंबकातील घड्याळांची जागा आता स्मार्ट वॉचनी घेतली आहे. घड्याळाचे स्वरूप बरेच बदलत चालले आहे. घड्याळे स्मार्ट होत चालली आहेत. मात्र, आताही अनेक घड्याळातील सेकंदाचे काटे जैसे थे आहेत आणि म्हणूनच मनात प्रश्न येऊन जातो, घड्याळाचे काटे फिरताना टिकटिक आवाज का येतो?

सोशल मीडियावर हा प्रश्न विचारण्यात आला होता की, घड्याळाचे काटे फिरताना टिकटिक आवाज का येतो? आणि त्यावर अनेक युझर्सनी वेगवेगळी उत्तरे दिली. एका युझरने दिलेले उत्तर मात्र बरेच लक्षवेधी होते. या प्रश्नाचे उत्तर देताना एक रेल्वे इंजिनअर असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, खरे तर हा आवाज बॅलन्स राखताना येतो. काटे फिरताना ते एकमेकांवर आदळतात त्यावेळी त्याच्या घर्षणाचा हा आवाज येतो. या आवाजालाच आपण टिकटिकचा आवाज म्हणतो.

ब्रॅमवेल ब्रूमच्या रिपोर्टनुसार, काही डिजिटल घड्याळे पेंडुलम घड्याळांसारखे आवाजही काढतात, पण त्यांचा आवाज तितकासा नसतो. आता घड्याळांमध्ये पूर्वीप्रमाणे मोठ्याने आवाज येत नाही. कालानुरूप आवाज कमी होत चालले आहेत. काही घड्याळांचा टिकटिकचा आवाज भरपूर मोठा येतो. अनेकदा याचा त्रासही होतो. त्यामुळे आता नवनवी घड्याळे कमी आवाजाची असलेली पहायला मिळतात. घड्याळात फिरणार्‍या खालच्या काट्याला एस्केप व्हिल म्हणतात. हा काटा फिरताना बॅलन् व्हिलचा काटा दोन्हींना नियंत्रित करतो. एकमेकांच्या सहाय्याने हे काटे मिनीट, तास, सेकंद नियंत्रित करत फिरतात आणि यामुळे त्याचा आवाज येतो, अशी त्यामागील रचना आहे.

SCROLL FOR NEXT