Mosquito Bites | सावधान! डास तुम्हालाच जास्त चावतात का? 
विश्वसंचार

Mosquito Bites | सावधान! डास तुम्हालाच जास्त चावतात का?

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : तुम्ही मित्र किंवा कुटुंबासोबत बसलेले असताना कधी असे जाणवले आहे का, की केवळ तुम्हालाच डास चावत आहेत आणि इतरांना नाही? जर तुम्हाला वाटत असेल की हा तुमचा केवळ भ्रम आहे, तर तुम्ही चुकीचे आहात. विज्ञानानुसार, डासांचीदेखील स्वतःची एक ‘पसंती’ असते आणि ते काही ठराविक लोकांना निवडून चावतात.

संशोधनानुसार, डासांना ‘ओ’ रक्तगट असलेले लोक सर्वाधिक ‘चविष्ट’ वाटतात. रक्तातील प्रथिनांच्या रचनेमुळे डास या ग्रुपच्या लोकांकडे जास्त आकर्षित होतात. त्याउलट, ‘ए’ रक्तगट असलेले लोक या बाबतीत नशीबवान ठरतात. कारण, डास त्यांना तुलनेने कमी चावतात. तसेच, डासांकडे कार्बन डायऑक्साईड ओळखण्याची अफाट शक्ती असते. जे लोक जास्त वेगाने श्वास घेतात किंवा जास्त कार्बन डायऑक्साईड सोडतात, त्यांच्याकडे डास चुंबकासारखे खेचले जातात.

सामान्य लोकांच्या तुलनेत गर्भवती महिला 21 टक्के जास्त कार्बन डायऑक्साईड सोडतात, त्यामुळे त्या डासांच्या निशाण्यावर अधिक असतात. याशिवाय जर तुम्हाला जास्त घाम येत असेल, तर डास तुम्हाला लवकर शोधून काढतात. आपल्या घामामध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड, युरिक अ‍ॅसिड आणि अमोनिया असते, ज्याचा वास डासांना खूप आवडतो. तसेच, ज्यांच्या शरीराचे तापमान जास्त असते, त्यांना डास अधिक त्रास देतात. वर्कआऊट केल्यानंतर डास चावण्याचे हेच मुख्य कारण आहे. कपड्यांचा रंगही डासांना आकर्षित करतो. डास काळा, गडद निळा किंवा लाल रंगाकडे लवकर आकर्षित होतात. कारण, हे रंग त्यांना दुरूनच स्पष्ट दिसतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT