बाली : ठरावीक ठिकाणीच अनेकदा भूकंप होणे यात नवीन काहीच नाही. इंडोनेशियातील बाली असेल, नेपाळमधील काही ठिकाणे असतील, तेथे सातत्याने भूकंप होत असतात. अगदी अलीकडेच भारताच्या बाजूचा देश नेपाळमध्ये भूकंप झाला. काठमांडू येथे आलेला हा भूकंप 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता, असे म्हटले जात आहे. त्याचा केंद्रबिंदू नेपाळ-तिबेट सीमा असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय चीनमधील डिंघी येथेही जोरदार भूकंप झाल्याचा दावा केला जात आहे; पण असे का? किंवा नेपाळमध्ये, इंडोनेशियातच असे का घडते, याचा कधी विचार केला आहे का?
नेपाळ हे हिमालय पर्वतराजीच्या मध्यभागी आहे. जे भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेटस्च्या सीमेवर आहे. भारतीय प्लेट उत्तरेकडे सरकत आहे आणि युरेशियनला टक्कर देत आहे, असे म्हटले जात आहे. या टक्करमुळे प्रचंड तणाव निर्माण होतो, जो वेळोवेळी भूकंपाच्या रूपात उद्भवतो. ही प्रक्रिया लाखो वर्षांपासून सुरू आहे, ज्यामुळे हिमालयदेखील तयार झाला. जेव्हा टेक्टोनिक प्लेटस् एकमेकांवर आदळतात तेव्हा त्यांची हालचाली विस्कळीत होते आणि त्यांच्यात ताण जमा होतो. हा ताण अचानक तुटतो आणि ऊर्जेच्या स्वरूपात बाहेर येतो. ज्यामुळे भूकंप होतात. नेपाळ ‘अॅक्टिव्ह सिस्मिक झोन’ मध्ये येते जेथे या प्रकारची ऊर्जा सोडली जाते. त्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा संकटाचा सामना करावा लागतो.
हिमालय पर्वत हा एक तरुण पर्वत आहे जो भूवैज्ञानिक द़ृष्टिकोनातून खूपच अस्थिर आहे. असे म्हटले जाते की येथील खडक देखील खूप कमकुवत आहेत, ज्यामुळे भूकंपाचा प्रभाव आणखी वाढतो. याशिवाय मातीची धूप आणि पावसामुळे जमीन सरकते आणि ही घटना अधिक गंभीर बनते. नेपाळमध्ये यापूर्वी 2015 मध्ये विनाशकारी भूकंप झाला होता. ज्याची तीव्रता 7.8 इतकी मोजली गेली. 1988 चा नेपाळ भूकंप याआधीही 21 ऑगस्ट 1988 रोजी नेपाळची धरती हादरली होती. जरी त्याची तीव्रता थोडी कमी होती.