बिस्किटांवर लहान छिद्रे का असतात? जाणून घ्या त्यामागचं वैज्ञानिक कारण! 
विश्वसंचार

Biscuits secret : बिस्किटांवर लहान छिद्रे का असतात? जाणून घ्या त्यामागचं वैज्ञानिक कारण!

चहा-नाश्त्यातील आवडीच्या बिस्किटांच्या डिझाईनमागील रंजक रहस्य आले समोर

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्‍ली : सकाळच्या चहाचा आस्वाद घेताना किंवा नाश्त्यामध्ये आपण अनेकदा बिस्‍कीट खातो. आजकाल बाजारात विविध डिझाईन आणि चवींचे बिस्किट्स उपलब्ध आहेत. परंतु, तुम्ही कधी विचार केला आहे का की काही बिस्किटांवर लहान-लहान छिद्रे (छेद) का बनवलेली असतात?अनेक लोकांना असे वाटते की ही छिद्रे केवळ बिस्किटाच्या डिझाईनचा किंवा सौंदर्याचा भाग आहेत, परंतु हे खरे नाही. यामागे एक महत्त्वाचे वैज्ञानिक आणि तांत्रिक कारण आहे.

प्रामुख्याने क्रीम आणि मऊ प्रकारच्या बिस्किटांवर ही छिद्रे पाहायला मिळतात. बिस्‍कीट बनवताना आणि भाजताना (बेकिंग) आत निर्माण होणारी वाफ बाहेर पडण्यासाठी ही छिद्रे तयार केली जातात. बिस्किट तयार करताना आत गरम क्रीम भरली जाते आणि वरून बिस्‍कीट ठेवले जाते. या प्रक्रियेत आत तयार होणाऱ्या वाफेला बाहेर पडण्यासाठी छिद्रांच्या माध्यमातून जागा मिळाली नाही, तर बिस्किटांवर दाब निर्माण होऊन ती फुटू किंवा तुटू शकतात. त्‍यामुळे बिस्‍कीट तुटण्यापासून बचाव करण्‍यासाठी छिद्रे केली जातात.

बिस्‍किटाचा आकार आणि दर्जा टिकवण्यासाठी छिद्रे महत्त्‍वाची ठरतात. बिस्‍कीट तुटू नयेत आणि त्यांचा आकार सुरळीत राहावा, यासाठी उत्पादन प्रक्रियेदरम्यान त्यावर ही लहान छिद्रे केली जातात, ज्यामुळे वाफ सहज बाहेर पडते आणि बिस्‍कीट कुरकुरीत राहते. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही बिस्‍कीट खाल, तेव्हा ही छिद्रे केवळ डिझाईन नसून बिस्‍कीट सुरक्षित ठेवण्यासाठी दिलेली एक महत्त्वाची तांत्रिक रचना आहे, हे मात्र नक्‍की लक्षात ठेवा!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT