Largest uranium reserves world | जगात युरेनियमचा सर्वाधिक साठा कोठे आहे? 
विश्वसंचार

Largest uranium reserves world | जगात युरेनियमचा सर्वाधिक साठा कोठे आहे?

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या युरेनियम साठ्याला ‘न्यूक्लियर डस्ट’ (अण्वस्त्र धूळ) असे संबोधले आहे. इराणमधून युरेनियम बाहेर काढणे ही अमेरिकेसाठी एक अत्यंत जटिल आणि दीर्घ प्रक्रिया असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्या युरेनियमसाठी जगात मोठे संघर्ष सुरू आहेत, ते नेमके काढले कसे जाते आणि त्यामागील विज्ञानाचे रहस्य काय आहे, याचा हा आढावा.

युरेनियम हा पृथ्वीच्या पोटातील ‘युरेनाईट’ खनिजापासून मिळवला जातो. याचे प्रमाण खूप कमी असते; कधीकधी एक टन दगडातून केवळ काही किलो युरेनियम मिळते. ऑस्ट्रेलिया : जगात सर्वाधिक युरेनियमचा साठा (सुमारे 28 टक्के) येथे आहे. कझाकिस्तान : हा देश युरेनियम साठ्याच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर. कॅनडा : तिसर्‍या क्रमांकावर असला, तरी येथे सर्वात उच्च दर्जाचे युरेनियम मिळते. कॅनडातील ‘सस्केचेवान’ प्रांतात युरेनियम उत्खनन करणे खूप कठीण आहे. कारण, युरेनियमच्या साठ्यांच्या वर वाळूचा असा थर आहे, ज्यात पाण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. जर थेट खोदाई केली तर खाणीत पाणी शिरून पूर येऊ शकतो. हे टाळण्यासाठी ‘आर्टिफिशियल ग्राऊंड फ्रीजिंग’ तंत्र वापरले जाते :

1. जमिनीखाली शेकडो खोल छिद्रे पाडली जातात. 2. त्यात विशेष पाईप्स घालून -30 अंश सेल्सिअस तापमानाचे ‘कॅल्शियम क्लोराईड ब्राईन’ (थंड द्रव) सोडले जाते. 3. यामुळे खाणीच्या चारही बाजूंनी बर्फाची एक मजबूत भिंत तयार होते, जी पाणी रोखून धरते. त्यानंतर रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने सुरक्षितपणे युरेनियम काढले जाते. नैसर्गिक युरेनियममध्ये ‘युरेनियम-235’ चे प्रमाण खूप कमी असते. हे प्रमाण कृत्रिमरीत्या वाढवण्याच्या प्रक्रियेला ‘एनरिचमेंट’ म्हणतात. वीज निर्मितीसाठी : केवळ 3 ते 5 टक्के संवर्धन पुरेसे असते. अण्वस्त्रांसाठी : 90 टक्क्यांहून अधिक संवर्धन आवश्यक असते. इराणने हे प्रमाण वाढवू नये, यासाठीच अमेरिका आणि इस्रायलचा विरोध आहे. शेंगदाण्याच्या आकाराची एक युरेनियमची गोळी हजारो घरांना कित्येक महिने प्रकाश देऊ शकते. जेव्हा युरेनियमच्या अणूवर ‘न्यूट्रॉन’चा मारा केला जातो, तेव्हा त्याचे विभाजन होऊन प्रचंड ऊर्जा बाहेर पडते, यालाच ‘न्यूक्लियर फिशन’ (नाभिकीय विखंडन) म्हणतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT