अंड्याचे ऑम्लेट पहिल्यांदा कुठे बनले? 
विश्वसंचार

अंड्याचे ऑम्लेट पहिल्यांदा कुठे बनले?

पुढारी वृत्तसेवा

पॅरिस ः अंड्यांपासून बनवलेली एक साधी, पण चविष्ट रेसिपी म्हणजे ‘ऑम्लेट’. जगभरात ऑम्लेट सर्वांनाच आवडते. जर तुम्हाला तुमची भूक कमी वेळात भागवायची असेल आणि काहीतरी हेल्दी, चविष्ट खायचे असेल तर ऑम्लेटशिवाय दुसरा कोणता बेस्ट ऑप्शन असूच शकत नाही. पण, तुम्ही कधी विचार केलाय का, कोणाच्या डोक्यात पहिल्यांदा ऑम्लेट बनवण्याचा विचार आला असेल? किंवा पहिल्यांदा ऑम्लेट कोणी बनवलं असेल? ऑम्लेट हा शब्द फ्रेंच भाषेतून आला आहे. 17 व्या शतकाच्या उत्तरार्धात 'Cuisine Bourgeoisie' या फ्रेंच रेसिपी बुकमध्ये त्याची पहिल्यांदा नोंद करण्यात आली.‘अल्युमेट’ हा शब्द 14 व्या शतकापासून वापरात होता. ही डिश फ्रान्सच्या आधी कुठेतरी नक्कीच अस्तित्वात असेल. कारण, जेव्हा आपण त्याच्या इतिहास पाहतो तेव्हा आपल्याला असे दिसते की, ही डिश कोणत्याही एका ठिकाणाची किंवा काळाची निर्मिती नाही, तर ती वेगवेगळ्या देशांच्या संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात तयार केली जाते.

ऑम्लेटच्या इतिहासातील एक प्रसिद्ध कथा फ्रेंच सम—ाट नेपोलियन बोनापार्टशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. नेपोलियन आणि त्याचे सैन्य एका शहरातून प्रवास करत होते. त्यावेळी त्यांना एका स्थानिक हॉटेलच्या मालकाने ऑम्लेट खाण्यास दिले. नेपोलियनच्या तोंडात ती चव रेंगाळत राहिली. त्याला ते इतके आवडले की, दुसर्‍या दिवशी त्याने शहरातून सर्व अंडी गोळा करून सैन्यासाठी एक मोठे ऑम्लेट बनवण्याचा आदेश दिला असल्याचे सांगितले जाते. आता ही कथा कितपत खरी किंवा खोटी, हे माहिती नाही; पण त्यानंतर फ्रान्समधील बॅसियर्स शहरात दरवर्षी एक मोठं ऑम्लेट तयार करण्याचा महोत्सव साजरा केला जाऊ लागला, ज्यामध्ये शेकडो अंड्यांपासून बनवलेले ऑम्लेट संपूर्ण शहरातील लोकांना खाण्यास दिले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT