Human Consciousness | मानवी मनात जाणिवा कुठून निर्माण होतात?  
विश्वसंचार

Human Consciousness | मानवी मनात जाणिवा कुठून निर्माण होतात?

पुढारी वृत्तसेवा

कॅलिफोर्निया : आपल्या मेंदूमध्ये जाणिवा किंवा चेतना (कॉन्‍सियसनेस) नेमकी कुठून निर्माण होते, हे न्यूरोसायन्ससमोरील सर्वात मोठे रहस्य आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक जानिस हेसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मॅकाक माकडांवर केलेल्या एका नवीन संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मेंदूमध्ये जाणिवा निर्माण होण्यासाठी 'ती जागा' कोणती यापेक्षा 'ती वेळ' कोणती, हे जास्त महत्त्वाचे असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे.

फ्रंट की बॅक? : जुना वाद

गेल्या अनेक वर्षांपासून न्यूरोसायंटिस्टमध्ये एक मोठा वाद सुरू आहे. काही तज्ज्ञांच्या मते जाणिवा निर्माण करणारी यंत्रणा मेंदूच्या पुढच्या भागात (फ्रंट) असते, तर काहींच्या मते ती मेंदूच्या मागच्या भागात (बॅक) असते. मात्र, या नवीन अभ्यासाने दोन्ही बाजूंच्या दाव्यांना मागे टाकत एक नवीनच पैलू समोर आणला आहे. माकडांवर कसा केला प्रयोग? संशोधकांनी माणसांवर यशस्वी चाचणी केल्यानंतर हा प्रयोग माकडांवर केला. यासाठी त्यांनी 'बायनॉक्युलर फ्लॅश सप्रेशन' नावाचे तंत्रज्ञान वापरले.

यामध्ये एका डोळ्यासमोर एक चित्र असताना दुसऱ्या डोळ्यासमोर अचानक दुसरे चित्र फ्लॅश केले जाते, ज्यामुळे पहिले चित्र मेंदूला दिसत असूनही जाणिवांमधून गायब होते. हा प्रयोग सुरू असताना माकडांच्या मेंदूतील शेकडो पेशींच्या (ब्रेन सेल्‍स) हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आले. मेंदूचा सेकंदाला १५ वेळा बदलणारी लय, ताल, वेग (हिडन रिदम) या प्रयोगादरम्यान शास्त्रज्ञांना मेंदूमध्ये एक अत्यंत वेगवान आणि अनपेक्षित पॅटर्न किंवा लय (रिदम) आढळली. मेंदूतील पेशी एका सेकंदात सुमारे १५ वेळा आपला प्रतिसाद बदलत होत्या. म्हणजेच, पेशी अतिशय वेगाने एकदा माकडाला 'दिसणाऱ्या' चित्राला प्रतिसाद देत होत्या, तर दुसऱ्याच क्षणी जाणिवांपासून 'लपलेल्या' चित्राला प्रतिसाद देत होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT