विश्वसंचार

जेवणाचा स्वाद वाढवणारा हिंग आला कुठून?

Arun Patil

नवी दिल्ली : काहीसा उग्र चवीचा हिंग भारतीय पदार्थांत हमखास वापरला जातो. अगदी चिवड्यापासून ते थेट साठवणीतील लोणच्यापर्यंत सगळ्या पदार्थांतच हिंगाचा वापर केला जातो. एवढंच नव्हे तर आयुर्वेदानुसार हिंगाचे महत्त्व अधिक आहे. महत्त्वाचे म्हणजे हिंगाची चव ही अगदी प्राचीन काळापासून, रोमन काळापासून लोकांना माहिती आहे. हिंग हा भारतीय पदार्थात हमखास वापरला जात असला तरीही तो भारतीय नाही…

हिंगाचा शोध सर्वप्रथम उत्तर आफ्रि केत घेण्यात आला असे मानले जाते. तिथे ही चवदार वनस्पती आढळली आणि अलेक्झांडरच्या काळात ती आशिया व युरोपमधील लोकांनाही समजली. भूमध्यसागरी प्रदेशांमध्ये म्हणजे इराण ओलांडल्यावर सगळीकडे हिंग मुबलक आहे. अलेक्झांडर द ग्रेटच्या मोहिमांनंतर हिंग युरोपात आल्याचे सांगण्यात येते.

भारतात हिंगाचे उत्पादन होत नाही. तो प्रामुख्याने अफगाणिस्तान, उझबेकिस्तान आणि इराणमधून कच्चा माल म्हणून येतो. हिंगाच्या जाड दुधात मैदा आणि डिंक मिसळून खाण्यायोग्य बनवले जाते. यानंतर नवीन पेस्ट 30 दिवस उन्हात वाळवली जाते. कोरडे करण्यासाठी ड्रायरचा वापर करता येत नाही. कारण यामुळे त्याचा सुवास नष्ट होतो. त्यानंतर याची पावडर तयार केली जाते. कच्च्या हिंगाचे घनरूप दूध अफगाणिस्तानच्या उच्च प्रदेशातील हिंदुकुश टेकड्यांमध्ये गोळा केले जाते. हे इराण आणि उझबेकिस्तानच्या थंड भागातही आढळते.

आधीच्या काळात बकर्‍याच्या चामडीत बंद करून ट्रान्सपोर्ट केले जात असते. आता दुधाची पिशवी किंवा जाड प्लास्टिकमध्ये गुंडाळून भारतात आणले जाते. हिंगामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत जे काही दाहक परिस्थिती कमी करण्यास मदत करू शकतात. त्यात कौमरिन आणि फ्लेव्होनॉइडस् सारखी संयुगे असतात जी शरीरात बॅक्टेरियाची वाढ रोखतात. हिंगामध्ये नैसर्गिक प्रतिजैविक गुणधर्म असतात. प्राचीन काळी, श्वासोच्छ्वासाच्या समस्या, खोकला आणि सर्दी यावर नैसर्गिक उपाय म्हणून याचा वापर केला जात असे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT