Google Mirror Dimension | गूगलचा नवा ‘मिरर डायमेंशन’ काय आहे?  
विश्वसंचार

Google Mirror Dimension | गूगलचा नवा ‘मिरर डायमेंशन’ काय आहे?

'एआय' ला चकमा देण्यासाठी उभारली नकली दुनिया

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : जर तुम्ही मार्वलचा 'डॉक्टर स्ट्रेंज' हा चित्रपट पाहिला असेल, तर तुम्हाला तो प्रसंग नक्कीच आठवत असेल जिथे डॉक्टर स्ट्रेंज एक वेगळी दुनिया उघडतात, अशी दुनिया जी अगदी खऱ्या शहरासारखी दिसते, पण तिथे झालेली कोणतीही तोडफोड मूळ जगावर परिणाम करत नाही. आता विचार करा, हीच कल्पना जर एआयसाठी काम करू लागली तर कसे होईल? क्रोम एआय सिक्योरिटी टीमने अगदी तसेच केले आहे आणि याला 'मिरर डायमेंशन' असे नाव दिले आहे. हा कोणताही चित्रपटाचा सेट नसून खऱ्या इंटरनेटची एक नकली प्रत (Copy) आहे, जी एआय एजंटस्‌ना कोणतेही खरे नुकसान न होता तपासता यावे यासाठी तयार करण्यात आली आहे.

आजकाल आपल्या सर्वांनाच रोजची कामे झटपट आणि सोप्या पद्धतीने व्हावीत असे वाटते. मग ती ऑनलाईन शॉपिंग असो, फॉर्म भरणे असो किंवा पॉडकास्ट डाऊनलोड करणे असो, क्रोमचे जेमिनीवर आधारित 'ऑटो ब्राऊझ' फीचर तुमच्याऐवजी अशीच कामे हाताळण्यासाठी बनवले गेले आहे. मात्र, अडचण तेव्हा येते जेव्हा एखादा एआय एजंट स्वतःहून बटण दाबतो आणि वेगवेगळ्या पानांवर जातो. त्याच्याकडून जराशीही चूक किंवा गैरसमज झाला, तर खरे खाते बिघडू शकते किंवा एखादे चुकीचे पेमेंट होऊ शकते. 'मिरर डायमेंशन' ही एक बंद आणि सुरक्षित डिजिटल जागा आहे, जिथे एआय चुका करू शकते, शिकू शकते आणि कोणत्याही खऱ्या वेबसाईटचा किंवा वापरकर्त्याचा डेटा धोक्यात येत नाही.

कोणत्याही एआय एजंटला शिकवण्यासाठी आणि तपासण्यासाठी शेकडो वेबसाईटस्‌वर हजारो कामे करून पाहावी लागतात. हे सर्व जर खऱ्या इंटरनेटवर केले गेले, तर सर्वात मोठी समस्या वेबसाईटस्‌ सतत बदलत राहण्याची येते. खऱ्या वेबसाईटस्‌ प्रत्येक क्षणी बदलत असतात, त्यामुळे चाचण्या पुन्हा-पुन्हा करून अचूक निष्कर्ष काढणे खूप कठीण होते. दुसरी आणि सर्वात मोठी बाब म्हणजे सुरक्षिततेची आहे. जर एखादा अर्धवट तयार झालेला एआय एजंट मोकळ्या इंटरनेटवर फिरू लागला आणि त्याच्याकडून एखादे चुकीचे क्लिक झाले किंवा त्याने एखाद्या गोष्टीचा चुकीचा अर्थ लावला, तर नुकसान प्रत्यक्ष होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT