नवी दिल्ली : हवाई वाहतूक एक्स्पर्टच्या मते, ‘केबिन क्रू’ हा शब्द विमानात काम करणार्या सर्वच कर्मचार्यांना वापरला जातो. विमानात प्रवाशांची काळजी घेणार्यांना सर्वांना केबिन क्रू म्हणतात. यामध्ये पायलट, को-पायलट, एअर होस्टेस अशा सर्वांचा समावेश होतो. फ्लाईट अटेंडेंट केवळ त्याच कर्मचार्यांना म्हटले जाते, जे विमानात प्रवाशांची काळजी वाहतात. त्यांच्या तक्रारी ऐकतात व त्यांची मदत करतात. गेटवर स्वागत करण्यापासून प्रवासाचा शेवट होईपर्यंत फ्लाईट अटेंडेंट प्रवाशाची काळजी घेतात. त्यांचे काम प्रवास सुरू झाल्यापासून प्रवास संपल्यानंतरही असतो.
आपल्याला वाटते, जसे आपण विमानातून उतरून जातो तसे एअर होस्टेस आणि फ्लाईट अटेंडेंटची ड्युटीदेखील संपते, असे नाही. त्यांना नंतर फ्लाईटचा फिडबॅकदेखील द्यावा लागतो. प्रवाशांच्या संदर्भात माहिती द्यावी लागते. जर कोणाला मेडिकल इमर्जन्सी झाली तर त्याबाबत विस्ताराने रिपोर्ट तयार करावा लागतो. म्हणजे पुढे चौकशी झाली तर उत्तर द्यायला सोपे होते. फ्लाईट अटेंडेंटदेखील दोन प्रकारचे असतात. महिला फ्लाईट अटेंडेंटना एअर होस्टेसदेखील म्हणतात. तर, पुरुषांना फ्लाईट स्टीवर्ड या नावाने ओळखले जाते. परंतु, आजकाल बहुतांशी लोक विमानातील प्रत्येक कर्मचार्यांना फ्लाईट अटेंडेंटच समजतात. केबिन क्रू एक व्यापक शब्द आहे.
या विमानात काम करणार्या सर्वच लोकांचा समावेश आहे. हे कर्मचारी विमानाच्या प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवतात. विमानाचे उड्डाण होताना प्रवाशांना कोणताही धोका होऊ नये याची जबाबदारी त्यांच्यावर असते. यात सीनिअर पायलट, फ्लाईट अटेंडेंट, पर्सर एवढेच काय तर ऑनबोर्ड शेफ यांचादेखील समावेश आहे. विमानात बसण्यापासून ते विमानातून उतरेपर्यंत प्रवाशांची सर्वच जबाबदारी त्यांच्यावर असते.
काही एअरलाईन्स एक्स्ट्रा शेफदेखील ठेवतात. म्हणजे प्रवाशांच्या मागणीनुसार डीश तयार केल्या जाव्यात. त्यांना ऑनबोर्ड शेफ नावाने ओळखले जाते. त्यांच्याकडे संपूर्ण किचन नसले, तर त्यांच्या अंगभूत कौशल्याने तेथील उपलब्ध सामग्रीनुसार खास पदार्थ तयार करतात. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास चांगला होतो. त्यामुळे प्रवाशांना फ्लाईट रेस्टॉरंटचा अनुभव घेता येतो. सोप्या भाषेत सांगायचे, तर सर्व फ्लाईट अटेंडेंट केबिन क्रू सदस्य असतात. परंतु, सर्व केबिन क्रू हे फ्लाईट अटेंडेंट नसतात.