वॉशिंग्टन : पृथ्वीचे हवामान फक्त सूर्य आणि चंद्र यामुळे बदलत नाही, तर आणखी एक ग्रह यासाठी कारणीभूत आहे. शास्त्रज्ञांनी एक आश्चर्यकारक शोध लावला आहे. ज्यामुळे खळबळ उडाली आहे. जगभरातील संशोधक अचंबित झाले आहेत. हा ग्रह दुसरा तिसरा कोणता ग्रह नसून मंगळ ग्रह आहे. मंगळ ग्रह पृथ्वीच्या हवामानावर खोलवर परिणाम करत आहे.
मंगळ ग्रह त्याच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीला खेचत आहे. ज्यामुळे पृथ्वीचे हवामान बदल आहे. नवीन संशोधन असे सूचित करते की, मंगळ पृथ्वीची कक्षा आणि कल नियंत्रित करतो. याला मिलानकोविच चक्र म्हणतात. मंगळाशिवाय पृथ्वीचे हवामान आजच्यासारखे नसते. स्टीफन केन यांच्या नेतृत्वाखालील या अभ्यासाने खगोलशास्त्रात खळबळ उडवून दिली आहे. इतर ग्रह आपल्या जगाला कसे चालवत आहेत हे ते दर्शविते. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, आपले हवामान एकाच ग्रहाची कहाणी नाही. लाखो वर्षांपासून, पृथ्वी कधी कधी गोठते आणि गरम होत आहे. शास्त्रज्ञ याला मिलानकोविच चक्र म्हणतात.
हे पृथ्वीच्या कक्षा आणि तिच्या कलतेवर अवलंबून असते. आतापर्यंत असे मानले जात होते की, गुरू आणि शुक्रसारखे मोठे ग्रह यामध्ये प्रमुख भूमिका बजावतात. परंतु, नवीन संशोधनाने ही विचारसरणी बदलली आहे. स्टीफन केन आणि त्यांच्या टीमने एक अनोखा प्रयोग केला. त्यांनी संगणक सिम्युलेशन वापरून मंगळाचे वस्तुमान शून्यावरून दहापट वाढवले. मंगळाच्या वस्तुमानातील बदलांचा पृथ्वीच्या कक्षेवर कसा परिणाम होतो, हे त्यांनी पाहिले. त्याचे परिणाम आश्चर्यकारक होते. लहान आकार असूनही, मंगळाचा प्रभाव खोलवर आहे.
हिमयुग आणण्यासाठी मंगळ ग्रह जबाबदार आहे का?
शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे की, सूर्यमालेत एक लय कार्यरत आहे. शुक्र आणि गुरू एकत्रितपणे 4,50,000 वर्षे चालणारे चक्र राखतात. ते एका मेट्रोनोमसारखे आहे, जे टिक टिक करत राहते. मंगळाचे वस्तुमान काहीही असो, हे चक्र अपरिवर्तित राहते. ते पृथ्वीच्या हवामानाचा आधार आहे; पण याहून आश्चर्यकारका गोष्ट म्हणजे एक लहान चक्रदेखील आहे, जे 100,000 वर्षे टिकते. हे चक्र पृथ्वीवर हिमयुग कधी येईल, हे ठरवते. संशोधनातून असे दिसून आले आहे की, हे चक्र मंगळावर अवलंबून आहे. जर मंगळाचे वस्तुमान वाढले, तर हे चक्र लांबते. याचा अर्थ असा की, मंगळ हा आपल्या हिमयुगाचा काळ ठरवणारा घटक आहे.