‘अहो’... नवर्‍याला भारतीय महिला काय म्हणतात? 
विश्वसंचार

‘अहो’... नवर्‍याला भारतीय महिला काय म्हणतात?

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली ः भारत हा असा देश आहे जिथे दर काही किलोमीटरवर बोली, भाषा, बोलण्याची पद्धत बदलत असते. मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ, तेलुगू, हरियाणवी, राजस्थानी अशा अनेक भाषा आपल्याला या देशात ऐकायला मिळतात. त्यातही काही शब्द, त्यांचे उच्चार वेगळे असतात; मात्र एवढा फरक असूनही सगळे, प्रेमाने, आपुलकीने बोलतात, वागतात हेच या देशाचे सामर्थ्य आहे. एकाच शब्दाची विविध रूपंही इथे आपल्या कानी पडतात.

आता पती किंवा नवरा हाच शब्द घ्या ना.. आपल्याकडे काही ठिकाणी ‘अहो’ म्हणतात, तर काही ठिकाणी ‘सैंया’ हाक मारतात. तर दुसर्‍या गावी , राज्यात त्यांना बलमुआ, बींद असंही म्हटलं जातं. म्हणजेच शब्द एक, अर्थही एक, पण त्याला नावं वेगवेगळी. प्रत्येक राज्यात आणि भाषेत प्रेमाची वेगळी बोली असू शकते, अनोखी पद्धत असते; पण भाव तोच असतो. भारतातल्या कोणत्या राज्यात पतीला काय म्हणतात, हे तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊया.

उत्तर प्रदेशात, पतीला ‘बलमुआ’ म्हणतात. हा शब्द प्रेमाची भावना जागृत करतो. तो गोड आणि जवळचा, आपलासा वाटणारा आहे. बिहारमध्ये पतीला ‘सइयां’ म्हणतात. हा शब्द प्रेम आणि आपुलकी दोन्ही दर्शवतो. भोजपुरी गाण्यांमध्येही ‘सइयां’ हा शब्द वारंवार ऐकायला मिळतो. राजस्थानमध्ये पतीला बिंद म्हणतात. याचा अर्थ जीवनसाथी. हरियाणामध्ये पतीला भरतार म्हणतात. महाराष्ट्रात पतीला ‘नवरा’ असं म्हणतात. पंजाबमध्ये पतीला ‘खासम’ म्हणतात. हिमाचल प्रदेशात पतीला ‘पौणे’ म्हणतात. छत्तीसगडमध्ये पतीला प्रेमाने ‘डउका’ म्हटले जाते. पश्चिम बंगालमध्ये पतीला ‘स्वामी’ म्हटले जाते. हा शब्द मोठ्या आदराने वापरला जातो. उत्तराखंडमध्ये पतीला ‘बैग’ म्हणतात. बिहारप्रमाणेच जम्मू आणि काश्मीरमध्ये देखील पतीला ‘सइयां’ असं म्हणतात. ओडिशामध्ये पतीला भर्ता म्हणतात. झारखंडमध्ये पतीला फक्त ‘पती’ असंच म्हटलं जातं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT