Retro AI Trend | रेट्रो ट्रेंडमध्ये सहभागी होण्याचे काय आहेत धोके?  
विश्वसंचार

Retro AI Trend | रेट्रो ट्रेंडमध्ये सहभागी होण्याचे काय आहेत धोके?

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या मदतीने ८० च्या दशकातील ‘रेट्रो’ फोटो बनवण्याचा ट्रेंड प्रचंड व्हायरल होत आहे. लोक आपले फोटो एआय टूल्सवर अपलोड करून त्यांना जुन्या काळातील एक नवा लूक देत आहेत. इन्स्टाग्राम, फेसबुक आणि एक्स (ट्विटर) यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोक या रेट्रो फोटोच्या माध्यमातून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.

या ट्रेंडचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ‘एआय’ फक्त चेहराच बदलत नाही, तर कपडे, दागिने आणि फोटोमधील संपूर्ण पार्श्वभूमी ८० किंवा ९० च्या दशकातील वातावरणात बदलते. फक्त वैयक्तिक फोटोच नाही, तर ग्रुप फोटोही एआयद्वारे पूर्णपणे बदलले जात आहेत. Google Gemini आणि ChatGPT सारख्या अनेक एआय टूल्सचा वापर करून हे फोटो तयार केले जात आहेत. यासाठी यूझरला आपला फोटो अपलोड करून त्याला रेट्रो लूक देण्याचा कमांड (Prompt) द्यावा लागतो.

लोक कशा प्रकारचे फोटो बनवत आहेत? या ट्रेंडशी निगडित प्रायव्हसी धोके काय आहेत, याचा विचारही गरजेचा आहे. जेव्हा एखादा यूझर एआय टूलवर आपला हाय-रिझोल्यूशन सेल्फी अपलोड करतो, तेव्हा ती केवळ एक साधी प्रतिमा नसते. त्यात यूझरचा चेहरा, परिसराची माहिती आणि फोटोचा मेटाडेटादेखील असतो. एआय कंपन्या हा डेटा स्टोअर करू शकतात. OpenAI (ChatGPT): पर्सनल प्लॅनमध्ये यूझर्सना मॉडेल ट्रेनिंगसाठी त्यांचा डेटा वापरला जाऊ नये, असा पर्याय (Opt-out) मिळतो. तात्पुरते चॅट (Temporary Chat) ट्रेनिंगसाठी वापरले जात नाहीत आणि ३० दिवसांत सिस्टीममधून हटवले जातात.

Google (Gemini) : गुगलनुसार काही डेटाचे मानवी परीक्षण (Human Review) केले जाऊ शकते. त्यामुळे गुगल यूझर्सना कोणतीही अत्यंत गुप्त किंवा संवेदनशील माहिती शेअर न करण्याचा सल्ला देते. डेटा पॉलिसी न वाचणे : लोक अनेकदा ट्रेंडच्या भरात ॲपची ‘डेटा पॉलिसी’ न वाचताच फोटो अपलोड करतात. एकदा फोटो थर्ड-पार्टी सर्व्हिसकडे गेला की, तो किती काळ ठेवला जाईल आणि कशासाठी वापरला जाईल यावर नियंत्रण राहत नाही. डीपफेक आणि गैरवापर : एआयने तयार केलेल्या या फोटोंचा भविष्यात डीपफेक, बनावट प्रोफाईल किंवा डिजिटल ओळख चोरण्यासाठी (Identity Theft) गैरवापर होऊ शकतो. काळजी : कोणताही फोटो अपलोड करण्यापूर्वी एआय प्लॅटफॉर्मची प्रायव्हसी पॉलिसी, डेटा कंट्रोल आणि डेटा डिलीट करण्याचे पर्याय नक्की तपासा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT