वजन घटवण्यासाठी व्हायरल होतोय ‘वॉटर वॉक’चा ट्रेंड! 
विश्वसंचार

वजन घटवण्यासाठी व्हायरल होतोय ‘वॉटर वॉक’चा ट्रेंड!

पुढारी वृत्तसेवा

मेक्सिको : बरेच लोक वजन कमी करण्यासाठी जिम, योगा आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतात. पण, जर या प्रयत्नांनंतरही अपेक्षित परिणाम मिळत नसतील, तर वॉटर वॉकची मदत घेता येऊ शकते, असे एका संशोधकांच्या एका पथकाने सुचवले आहे. पाण्यात चालणे हा जलद वजन कमी करण्याचा एक सोपा मार्ग आहे. दररोज पाण्यात चालल्याने केवळ वजन कमी होण्यास मदत होते असे नाही, तर सांधेदुखी, संधिवात, त्वचेच्या समस्या, मानसिक आरोग्य, नैराश्य आणि चिंता यासारख्या समस्यादेखील कमी होतात, असे यात नमूद आहे.

पाण्यात चालण्याचे अनेक गोष्टींसाठी फायदे आहे. हे शारीरिक, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. संपूर्ण शरीराचे वर्कआऊटपाणी शरीराला नैसर्गिकपणे प्रतिकार करते, ज्यामुळे पाय, हिप्स, पाठीचे स्नायू आणि शरीराचे इतर स्नायू अधिक सक्रिय होतात. यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. हृदय आणि फुफ्फुसांचे आरोग्य: पाण्यात चालण्यामुळे हृदयाचे कार्य सुधारते आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. यामुळे हृदयाच्या आरोग्यास लाभ होतो आणि श्वसन व्यवस्थेवरही सकारात्मक प्रभाव पडतो. वजन कमी होण्यास मदत: पाण्यात चालण्यामुळे जास्त कॅलरी जाळली जातात. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

याशिवाय, पाण्यात चालल्याने मानसिक ताण कमी होतो आणि एक प्रकारचा आरामदायक अनुभव मिळतो. पाण्यात चालताना शरीरावरचा ताण कमी होतो, ज्यामुळे मानसिक शांतता मिळवणे सोपे होते. पाणी शरीराच्या लवचिकतेला चालना देते. कारण, पाणी शरीराला मऊपण आणि लवचिकता देते. यामुळे शरीर अधिक लवचिक बनते. पाण्यात चालताना पचनसंस्था उत्तेजित होते. कारण, शरीराच्या हालचालींमुळे पचनक्रिया गतिमान होऊ शकते. पाण्यात चालणे मानसिक स्पष्टता वाढवते आणि एकाग्रतेला चालना देते, जे मानसिक स्वास्थ्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

कमी वेळात लवकर वजन कमी करण्याचा पाण्यात चालणे हा एक सोपा मार्ग आहे. मात्र, जर ते योग्यरीत्या केले नाही, तर व्यक्तीला थकवा जाणवू लागतो. वॉटर वॉक करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा लवकर थकवा जाणवू लागेल. हा व्यायाम करताना, पाण्यात वेगाने हालचाल करण्याचा प्रयत्न करा. चालण्यासाठी, पाणी कंबरेपर्यंत असावे, जेणेकरून पायांचे स्नायू व्यवस्थित काम करू शकतील. वॉटर वॉक करण्यासाठी, कोणताही समुद्रकिनारा किंवा स्विमिंग पूल निवडणे योग्य ठरू शकते, असेही यावेळी नमूद केले गेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT