वॉशिंग्टन ः नवीन संशोधनानुसार, ब—ह्मांडात पाणी हे वैज्ञानिकांच्या आधीच्या अंदाजांपेक्षा अब्जावधी वर्षे आधीच अस्तित्वात असू शकते. याचा अर्थ असा होतो की जीवनदेखील अपेक्षेपेक्षा खूपच जुने असू शकते. पृथ्वीवरील जीवनासाठी पाणी हा अत्यावश्यक घटक आहे. मात्र, ब—ह्मांडात पाणी नेमके कधी निर्माण झाले यावर संशोधक अनेक दशके संशोधन करत आहेत. नवीन संशोधनातून असे सूचित होते की, ‘बिग बँग’नंतर केवळ 100 ते 200 दशलक्ष वर्षांत पाणी अस्तित्वात आले असावे.
हे संशोधन ‘नेचर अॅस्ट्रॉनॉमी’ या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले. प्रारंभीच्या ब—ह्मांडात मुख्यतः हायड्रोजन, हेलियम आणि लिथियम अशी साधी मूलद्रव्ये होती. त्यानंतर पहिल्या तार्यांच्या निर्मितीमुळे आणि त्यांच्या सुपरनोव्हा स्फोटांमुळे जड मूलद्रव्ये तयार झाली. अशाच स्फोटांमुळे ऑक्सिजन निर्माण झाला आणि हायड्रोजनसोबत संयोग होऊन पाणी निर्माण झाले. संशोधनाच्या सहलेखक आणि युनिव्हर्सिटी ऑफ पोर्टस्मथ येथील खगोलशास्त्रज्ञ डॅनियल व्हेलन म्हणतात, ‘सुपरनोव्हा स्फोटांमध्ये तयार झालेल्या ऑक्सिजनने हायड्रोजनसोबत संयोग साधून पाणी निर्माण केले. त्यामुळे जीवनसृष्टीसाठी आवश्यक मूलभूत घटक तयार होऊ शकले.‘संशोधकांनी सर्वात प्राचीन सुपरनोव्हा स्फोटांचा अभ्यास केला. त्यांनी ‘पॉप्युलेशन 3’ नावाच्या पहिल्या तार्यांच्या स्फोटांचे मॉडेल्स तपासले. हे स्फोट दोन प्रकारचे होते, 1. कोर-कोलॅप्स सुपरनोव्हा ः ज्या तार्यांचे स्वतःच्या गुरुत्वाने कोसळून स्फोट झाले. 2. पेअर-इन्स्टॅबिलिटी सुपरनोव्हा ः तार्याच्या अंतर्गत दाबात अचानक घट झाल्याने अर्धवट कोसळलेले स्फोट.
संशोधनात असे आढळले की बिग बँगनंतर लवकरच या सुपरनोव्हा स्फोटांमुळे गॅसचे जड ढग तयार झाले, ज्यामध्ये पाणी असण्याची शक्यता आहे. हे पाणी तारका आणि ग्रह निर्माण होण्याच्या भागांमध्ये केंद्रित झाले असावे. संशोधनाचा निष्कर्ष असा आहे की पाणी आणि जीवननिर्मितीसाठी आवश्यक घटक हे यापूर्वीच्या संशोधनाच्या अंदाजांपेक्षा लवकर अस्तित्वात आले असावेत. व्हेलन म्हणतात, ‘याचा अर्थ असा की जीवनाच्या निर्मितीसाठी आवश्यक परिस्थिती ब—ह्मांडाच्या सुरुवातीलाच उपलब्ध होत्या, यामुळे आपले आकलन मोठ्या प्रमाणात पुढे जाते.‘ब—ह्मांडातील सर्वात जुन्या तार्यांचा अभ्यास करण्यासाठी तयार करण्यात आलेली जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप भविष्यात या संशोधनाला आणखी बळ देऊ शकते. या दुर्बिणीद्वारे मिळणार्या निरीक्षणांमुळे या गृहितकांना अधिक पुष्टी मिळू शकते.