Sleep disorder 
विश्वसंचार

Sleep disorder| रात्री दोन-तीन वाजता जाग येऊन झोपच लागत नाही?

जाणून घ्या त्यामागील मुख्य कारणे

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : सात-आठ तासांची गाढ झोप ही तन-मनाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते; मात्र अनेक लोकांना रात्री अचानक २ किंवा ३ वाजता जाग येते. त्याहूनही त्रासदायक प्रकार म्हणजे एकदा जाग आल्यावर बराचवेळ झोप लागत नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात, असे तज्ज्ञ सांगतात.

आपली झोप ही सलग एकसारख्या अवस्थेत नसते. ती वेगवेगळ्या टप्प्यांमधून- हलकी म्हणजे सावध, गाढ आणि स्वप्नांच्या (REM) झोपेतून चक्रांमध्ये फिरत असते. साधारण ९० मिनिटांनी हे चक्र बदलत असतं. रात्रीच्या पहिल्या अर्ध्या भागात गाढ झोप जास्त असते, तर पहाटेपर्यंत झोप हलकी म्हणजे सावध होत जाते. त्यामुळे २ ते ३ वाजण्याच्या सुमाराला शरीर झोपेच्या हलक्या टप्प्यात असतं आणि अगदी छोट्या कारणांमुळेही आपल्याला जाग येऊ शकते. पण काही वेळा तणाव, हार्मोन्समधील बदल, जीवनशैली किंवा आरोग्याच्या समस्या यामुळे ही जाग टिकून राहते आणि पुन्हा झोप येणं कठीण होतं. रात्री २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान जाग येण्यामागे अनेक घटक एकत्र काम करत असतात.

सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे शरीराची नैसर्गिक ‘सर्केडियन रिदम’ म्हणजेच जैविक घड्याळ. या वेळेला शरीर पुढच्या दिवसासाठी हळूहळू तयार होऊ लागते. इथे ‘कॉर्टिसोल’ या हार्मोनबद्दल माहिती असणं आवश्यक असतं. हे हार्मोन आपल्याला जागं होण्यासाठी मदत करत असतं. झोपेच्या टप्प्यात ते वाढत असतं. साधारण परिस्थितीत ही वाढ इतकी हळू असते की आपल्याला त्याची जाणीवही होत नाही. पण सततचा तणाव, चिंता किंवा झोपेतील व्यत्यय असल्यास कॉर्टिसोलची पातळी आधीच जास्त असू शकते. अशावेळी ही नैसर्गिक वाढ अचानक ‘अलर्ट’ सिग्नलसारखी काम करते आणि झोप मोडते. एकदा जाग आल्यावर मन पूर्णपणे जागृत होऊन मनात वेगाने विचार फिरू लागतात, त्यामुळे लवकर झोप लागत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT