Richest Political Leader | पुतीन ठरले जगातील सर्वात श्रीमंत राजकीय नेते 
विश्वसंचार

Richest Political Leader | पुतीन ठरले जगातील सर्वात श्रीमंत राजकीय नेते

ट्रम्प आणि ऋषी सुनाक यांचाही समावेश

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्रप्रमुखांची आणि नेत्यांची नवी यादी समोर आली असून, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. विशेष म्हणजे, संपत्तीच्या बाबतीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असोत की सौदीचे क्राऊन प्रिन्स किंवा ब्रुनेईचे सुलतान, कोणीही पुतीन यांच्या आसपासही नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्वतःला जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानतात आणि त्यांचा मोठा कौटुंबिक व्यवसाय आहे, तरीही संपत्तीच्या बाबतीत ते पुतीन यांच्यापेक्षा खूप मागे आहेत.

व्लादिमीर पुतीन यांची संपत्ती नेहमीच गूढ राहिली असून, त्याची कधीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, अमेरिकन गुंतवणूकदार बिल ब्राऊडर यांच्या दाव्यानुसार, पुतीन यांची एकूण संपत्ती सुमारे २०० अब्ज डॉलर्स (अंदाजे १७.४ लाख कोटी रुपये) असू शकते. क्रेमलिनने हा दावा कायम फेटाळला असला, तरी नामांकित ‘फॉर्च्यून’ मासिकात प्रसिद्ध झालेल्या माहितीच्या आधारे हा दावा करण्यात आला आहे. यादीत समाविष्ट असलेले हे जागतिक नेते केवळ त्यांच्या राजकीय ताकदीमुळेच नव्हे, तर त्यांच्याकडे असलेल्या अफाट संपत्तीमुळेही चर्चेत असतात. यातील काही नेत्यांनी व्यवसायातून अमाप पैसा कमावला आहे, तर काहीजण शाही घराण्यातील असून त्यांना ही संपत्ती वारसाहक्काने मिळाली आहे.

जगातील सर्वात श्रीमंत नेत्यांची यादी

१. व्लादिमीर पुतीन (रशियाचे राष्ट्राध्यक्ष) : २०० अब्ज डॉलर्स

२. वजिरालोंगकोर्न (थायलंडचे राजे) : ४३ अब्ज डॉलर्स

३. हसनाल बोल्कियाह (ब्रुनेईचे सुलतान) : सुमारे ३० अब्ज डॉलर्स

४. शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान (युएईचे राष्ट्राध्यक्ष) : सुमारे ३० अब्ज डॉलर्स

५. मोहम्मद बिन सलमान (सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स व पंतप्रधान) : २० अब्ज डॉलर्स

६. डोनाल्ड ट्रम्प (अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष) : ५ ते ६ अब्ज डॉलर्स

७. ऋषी सुनाक आणि अक्षता मूर्ती (ब्रिटेनचे माजी पंतप्रधान व त्यांची पत्नी) : एकूण संपत्ती सुमारे ५६३ दशलक्ष पाऊंड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT