‘हे’ पदार्थ आहेत ‘बी 12’ जीवनसत्त्वाचे स्रोत Pudhari File Photo
विश्वसंचार

‘हे’ पदार्थ आहेत ‘बी 12’ जीवनसत्त्वाचे स्रोत

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे शरीर होऊ शकते कमकुवत

पुढारी वृत्तसेवा

व्हिटॅमिन बी 12 शरीरासाठी महत्त्वाचे असते. शाकाहारी लोकांमध्ये त्यांची कमतरता असते. व्हिटॅमिन बी 12 हे मांसाहारी पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. परंतु काही ड्रायफ्रूटस्मध्येही याचे प्रमाण चांगले असते. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे शरीर कमकुवत होऊ शकते. व्हिटॅमिन बी 12 चे चांगले स्रोत कोणते ड्रायफ्रूट आहेत ते जाणून घ्या.

मनुका :

मनुके हे व्हिटॅमिन बी 12 चे चांगले स्रोत आहेत. रात्री मनुका भिजवून सकाळी त्या खाल्ल्यामुळे त्याचा चांगला फायदा होतो. मनुका इतर ड्रायफ्रूटच्या तुलनेत स्वस्तसुद्धा असतात. मनुका खाल्ल्यामुळे हाडे अधिक मजबूत होतात.

खजूर :

खजुरामध्ये नैसगिर्र्क गोडवा असतो. हा पदार्थ चविष्टसुद्धा आहे. यामध्ये व्हिटॅमिन बी 12 देखील चांगले असते आणि विविध पदार्थांमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. उपवास असताना अनेक वेळा खजूरचे सेवन केले जाते. खजूर खाल्ल्यामुळे मेंद अधिक तल्लख होतो.

काजू :

काजू हे व्हिटॅमिन बी 12 चे मौल्यवान स्रोत आहेत. हे बर्‍याचदा स्नॅक म्हणून खाल्ले जातात. तसेच विविध पदार्थांमध्ये त्याचा वापर केला जातो. काजूचा वापर केल्यामुळे तुमचा आहार स्वादिष्ट आणि पौष्टिकसुद्धा होतो.

पिस्ता :

पिस्ता केवळ स्वादिष्टच असतात असे नाही तर त्यामध्ये व्हिटॅमिन बी 12 चे प्रमाण देखील चांगले आहे. ते स्नॅक म्हणून, सॅलड टॉपिंग म्हणून किंवा दही किंवा डेझर्टमध्ये मिसळून खाल्ले जाऊ शकतात. पिस्तामध्ये फाइबर मुबलक प्रमाणात असते.

बदाम :

बदामात व्हिटॅमिन बी 12 च्या लक्षणीय आहे. बदाम खाण्याचे अनेक फायदे आरोग्याला होतात. नाश्त्यामध्ये किंवा सॅलडस्, दही किंवा मिष्टान्नामध्ये बदाम टाकून खातात. भारतात बदामाचे उत्पादन पुरेसे नसल्याने त्याची अफगाणिस्तान व इराण येथून आयात होते.

भोपळ्याच्या बिया :

भोपळ्याच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन बी 12 असते. तसेच इतर आवश्यक पोषक तत्त्वांचा त्यामध्ये समावेश असतो. आपल्या रोजच्या आहारात भोपळ्याच्या बियांचा समावेश करा किंवा स्नॅक म्हणून खा. याशिवाय सूर्यफुलाच्या बिया, अंजीर, अक्रोड यामध्येही बी 12 असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT