Viral Mystery Girl Aira Rawat | ‘ती’ सौंदर्यवती खरी की ‘एआय जनरेटेड’? 
विश्वसंचार

Viral Mystery Girl Aira Rawat | ‘ती’ सौंदर्यवती खरी की ‘एआय जनरेटेड’?

पुढारी वृत्तसेवा

कोलंबो : सध्याच्या ‘एआय’च्या जमान्यात खरे काय आणि खोटे काय हे कळणे दुरापास्तच झाले आहे. अनेक आभासी व्यक्तिमत्त्वे सध्या लोकांना भुरळही घालत आहेत. असाच प्रकार सध्या ‘टी 20 वर्ल्डकप’च्या निमित्ताने चर्चेत आला आहे. आयसीसी टुर्नामेंटच्या उत्साहादरम्यान अनेकदा स्टेडियममधील एखादा क्षण कॅमेर्‍यात कैद होतो. आता ‘टी 20’ विश्वचषक स्पर्धेदरम्यान एक तरुणी तुफान व्हायरल होत आहे. भारत विरुद्ध अमेरिका सामन्यादरम्यान आयरा रावत नावाच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि पांढर्‍या स्कर्टमध्ये आयरा कॅमेर्‍यासमोर पाहून स्मितहास्य देत होती. काही वेळातच तिचे इंस्टाग्राम फॉलोअर्स 3,000 वरून वाढून लाखोंमध्ये झाले. मात्र, ही खरीच आहे की ती निव्वळ ‘एआय’ने निर्माण केलेला सुंदर आभास आहे, अशी आता चर्चा रंगली आहे.

आयरा रावत हिच्या सौंदर्याने चाहत्यांमध्ये भुरळ पडली आहे. मात्र, काही जणांकडून संशय व्यक्त केला जात आहे. काही युजर्सना तिचे फोटो अपेक्षेपेक्षा जास्त परफेक्ट वाटले. तिचा बेदाग चेहरा, लायटिंग, फ्रेमिंगबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. काही जणांनी हा फोटो ‘एआय जनरेटेड’ असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे ‘आयरा’च्या नावाचे स्पेलिंगही ‘एआय’पासूनच सुरू होते (AIra). ‘एआय इन्फ्लुएन्सर’ एक व्हर्चुअल पर्सनॅलिटी असते. ही व्यक्ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि थ्रीडी डिझाईनमधून तयार केली जाते. ही व्यक्ती सोशल मीडियावर सक्रिय असते.

ब्रँड प्रमोशन करते आणि लाखो फॉलोअर्स कमावते. या ट्रेंडचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे Lil Miquela. 2016 मध्ये एका स्टार्टअपने अशा प्रकारचं कॅरेक्टर तयार केले होते. या कॅरेक्टरने अनेक ग्लोबल ब्रँडसोबत काम केले आणि मिलियन फॉलोअर्स मिळवते. आयरा रावतच्या प्रकरणात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, काही एआय डिटेक्शन टूल्सने या फोटोंवर संशय व्यक्त केला आहे. सोशल मीडिया आणि एआयच्या जगात खरं आणि खोट्यामधील फरक जाणून घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे फॉलो करण्यापूर्वी सत्य जाणून घेणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT