मोनालिसा : महाकुंभमेळा ते पहिले गाणे ‘सादगी’ Pudhari File Photo
विश्वसंचार

मोनालिसा : महाकुंभमेळा ते पहिले गाणे ‘सादगी’

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली मोनालिसा भोसले आता एक स्टार बनली आहे. या वर्षाच्या जानेवारी महिन्यापासून चर्चेत असलेली मोनालिसा लवकरच चित्रपटांमध्येही दिसणार आहे. तत्पूर्वी, तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शनिवारी, व्हायरल गर्ल मोनालिसाचे एका म्युझिक अल्बममधील पहिले गाणे ‘सादगी’ प्रदर्शित झाले आहे, ज्याद्वारे तिने अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे.

मोनालिसाचा पहिला म्युझिक व्हिडीओ ‘सादगी’ उत्कर्ष सिंहसोबत प्रदर्शित झाला आहे. या व्हिडीओमध्ये मोनालिसा पांढर्‍या लेहंग्यात अतिशय सुंदर दिसत आहे. आपल्या टपोर्‍या, पिवळसर डोळ्यांमुळे प्रसिद्ध असलेल्या मोनालिसाच्या या डोळ्यांवरही गाण्यात ‘फोकस’ केलेला दिसतो. गाण्याचे बोलही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. तसेच, मोनालिसा आणि उत्कर्ष सिंह यांच्यातील केमिस्ट्रीही अप्रतिम दिसत आहे. व्हायरल गर्ल मोनालिसाचा पहिला म्युझिक व्हिडीओ समोर येताच प्रेक्षकांकडून त्याला भरभरून प्रेम मिळत आहे. एका यूजरने लिहिले की, ‘मोना तर आहेच क्यूट.’ तर दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘खूप सुंदर, भाग्यवान मुलगी.’

आणखी एका यूजरने म्हटले की, ‘म्हणूनच तिचे नाव मोनालिसा आहे, ज्या दृष्टिकोनातून पाहाल तशी दिसेल. अप्रतिम गाणे.’ रीलिज होताच काही वेळातच हे गाणे हजारो लोकांनी पाहिले. याच वर्षी 2025 मध्ये प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यादरम्यान माळा विकणारी एक मुलगी व्हायरल झाली होती, जिच्या डोळ्यांनी सर्वांना वेड लावले होते. ती मुलगी दुसरी कोणी नसून मोनालिसा होती, जिला काही काळानंतर दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी चित्रपटांमध्ये कास्ट करण्याची घोषणा केली होती. याच कारणामुळे मोनालिसा रातोरात स्टार बनली. आता तिने अभिनयाच्या जगतात पदार्पण केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT