Vietnam Cat Rescue | व्हिएतनाममध्ये ४०० मांजरांना वाचवले 
विश्वसंचार

Vietnam Cat Rescue | व्हिएतनाममध्ये ४०० मांजरांना वाचवले

पुढारी वृत्तसेवा

हनोई (व्हिएतनाम) : व्हिएतनाममधील हो चि मिन्ह सिटी येथे पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत कत्तलखान्यातून ४०० हून अधिक मांजरांची सुटका केली आहे. ही मांजरे 'कॅट मीट' (मांजराचे मांस) गुन्हेगारी टोळीने चोरून आणली होती. या कारवाईत पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. प्राणी कल्याण संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या ४५ पिंजऱ्यांमधून सुमारे ४०० जिवंत मांजरे आणि बर्फाच्या कंटेनरमधून ८० मृत मांजरे जप्त करण्यात आली आहेत.

व्हिएतनाममध्ये मांजराचे मांस सुमारे ७०,००० व्हिएतनामी डोंग (अंदाजे २.७० डॉलर्स किंवा २२५ रुपये) प्रति किलो दराने विकले जाते. संशयितांनी गेल्या तीन वर्षांत दक्षिण व्हिएतनाममधून ही मांजरे चोरल्याची कबुली दिली आहे. या कारवाईनंतर ४० हून अधिक मांजरांना त्यांच्या मूळ मालकांकडे सुखरूप सोपवण्यात आले आहे; मात्र अत्यंत अमानुष आणि अत्यंत दाटीवाटीच्या परिस्थितीत ठेवल्यामुळे काही डझन मांजरांचा मृत्यू झाला. सध्या अनेक पशुवैद्यक आणि स्वयंसेवक या वाचवलेल्या मांजरांवर उपचार करत आहेत. व्हिएतनाममध्ये कुत्रे आणि मांजरांचे मांस खाणे कायदेशीर आहे; परंतु त्यासाठी प्राण्यांच्या उत्पत्तीचा परवाना आवश्यक असतो. या घटनेमुळे व्हिएतनाममधील 'कॅट मीट' व्यापाराचे भीषण वास्तव समोर आले असून, प्राण्यांच्या सुरक्षेसाठी कायदे अधिक कडक करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT