विश्वसंचार

बँक खात्यात ठणठणाट, तरी असाही जुगाड!

Arun Patil

नवी दिल्ली : महिनाअखेरला खात्यात पैशाचा ठणठणाट, अनेकांसाठी सवयीचे असते. पण, खात्यात असा ठणठणाट असतानादेखील पैसे मिळवण्यासाठी असे काही जुगाड केले जातात, जे निव्वळ थक्क करणारे असतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून, यात पैशासाठी केलेला जुगाड असाच थक्क करून जातो.

या व्हिडीओनुसार, दोन तरुण एटीएममध्ये पोहोचतात. यापैकी एकजण बाहेर थांबतो, तर एकजण आतमध्ये जाऊन एटीएममध्ये आपला बँक बॅलन्स तपासतो. स्लीपमध्ये आढळून येते की, खात्यात पूर्ण ठणठणाट आहे. त्यामुळे पैसे काढता येत नाहीत. हा तरुण एटीएमबाहेरील आपल्या सहकार्‍याला याची कल्पना देतो. पण, ते प्रयत्न सोडून देत नाहीत.

त्यानंतर ते दोघेही आत जातात आणि याच एटीएममधील डस्टबिनमध्ये टाकून दिलेल्या स्लीप एकत्रित करतात. तो गठ्ठा घेऊन रद्दीचे दुकान गाठतात आणि रद्दीचे 20 रुपये मिळवतात. यानंतर दोघेही त्या पैशात चहा पितात. निक हंटर या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. चहासाठी इतकी मेहनत अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे, तर अनेकांनी याचा खरपूस समाचारही घेतला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT