Pudhari File Photo
विश्वसंचार

‘या’ देशाच्या लष्करात आहेत 150 सैनिक

जगातील सर्वात छोटा देश

पुढारी वृत्तसेवा

रोम : जगातील सर्वात छोटा देश व्हॅटिकन सिटी आहे. इटलीची राजधानी रोम शहरात हा चिमुकला देश आहे. हे रोमन कॅथलिक चर्च आहे. तिथे सर्वोच्च धर्मगुरू पोप राहतात. व्हॅटिकन सिटी अत्यंत आकर्षक, सुंदर आहे. हा देश जवळपास 100 एकरवर पसरला आहे. येथे हजारांहून कमी लोक राहतात. याठिकाणी प्रत्येक वर्षी लाखो लोक येतात. या देशाकडील लष्करसुद्धा छोटे आहे. या लष्करात 150 हून कमी सैनिक आहेत.

पोपच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. पोपच्या संरक्षणार्थ प्रसंगी मृत्यू पत्करण्याची शपथ ते घेतात. या लष्करासाठी सैनिक कॅथलिक असणे आवश्यक आहे. केवळ पुरुषांनाच भरती होता येते. त्यासाठी वयाची मर्यादा 19 ते 30 वर्षादरम्यान आहे. सैनिकाची उंची 174 सेंमी असणे आवश्यक आहे. हे सैनिक कधीच युद्धात सहभागी होत नाहीत. त्यांना मोठे वेतन असते. या सैनिकांना सुमारे 4.5 लाख रुपये मासिक वेतन मिळते. इतर भत्ते, अनुषंगिक लाभांसह त्यांना वार्षिक एक कोटी रुपयांपर्यंत वेतन मिळते. व्हॅटिकन देश टायबर नदीच्या किनारी, व्हॅटिकन पहाडावर वसलेला आहे. विश्वविख्यात कलाकारांनी तिथे भव्य-दिव्य वास्तू व सुंदर कलाकृती निर्माण केलेल्या आहेत. 11 फेब—ुवारी 1929 रोजी व्हॅटिकन इटलीपासून वेगळा होऊन एक स्वतंत्र देश म्हणून ओळखला जाऊ लागला. व्हॅटिकन राज्य ग्रंथालयात सुमारे दीड लाख दुर्मीळ हस्तलिखितांचा खजिना आहे. ख्रिस्तपूर्व आणि इसवी सनाच्या आरंभीच्या काळातील सुमारे 16 लाख छापील पुस्तके तिथे उपलब्ध आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT