नवी दिल्ली : सिमला मिरची त्याच्या विविध रंग आणि चवीसाठी प्रसिद्ध आहे. हिरवा, लाल, पिवळा, केशरी आणि चक्क काळ्या रंगाचीही सिमला मिरची असते. सिमला मिरचीच्या वेगवेगळ्या रंगांमध्ये वेगवेगळे पोषक घटक असतात आणि वेगवेगळे आरोग्य फायदे देतात. चला जाणून घेऊया या पाच रंगीत शिमला मिरचींचे गुण.
लाल सिमला मिरची : या मिरचीमध्ये कॅप्सेसिन आणि कॅरोटीनॉइड्स असतात. हे अँटिऑक्सिडंट्सचे काम करतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. हिरवी सिमला मिरची : यामध्ये व्हिटॅमिन 'सी' आणि क्लोरोफिल असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते. पिवळी सिमला मिरची : यामध्ये कॅरोटीनॉइड असतात जे डोळ्यांसाठी फायदेशीर असतात आणि रेटिनाचे संरक्षण करतात. ब्लॅक सिमला मिरची : यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात जे कॅन्सरशी लढण्यास मदत करतात.
ऑरेंज सिमला मिरची : त्यात बीटा कॅरोटीन आढळते ज्यामुळे त्याला केशरी रंग येतो. बीटा कॅरोटीन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरु शकते. संशोधनात असे दिसून आले आहे की लाल रंगाच्या सिमला मिरचीमध्ये पोषक तत्त्वांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या पाच रंगांच्या सिमला मिरच्यांपैकी सर्वात पोषक ठरते लाल रंगाची सिमला मिरची.