Longest Hair Record | उत्तराखंडच्या रेनू यांची सर्वात लांब केसांसाठी ‘गिनीज बुक’मध्ये नोंद 
विश्वसंचार

Longest Hair Record | उत्तराखंडच्या रेनू यांची सर्वात लांब केसांसाठी ‘गिनीज बुक’मध्ये नोंद

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे राहणाऱ्या रेनू धरीवाल यांच्या नावाची नोंद प्रतिष्ठित ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. रेनू यांचे केस हे जगातील सर्वात लांब केस मानले जात असून, त्यांची लांबी एका माणसाच्या उंचीपेक्षाही जास्त आहे. त्यांच्या केसांची लांबी तब्बल २७१.५० सेंटिमीटर म्हणजेच ८ फूट १० इंच इतकी आहे!

सामान्य माणसाच्या केसांची लांबी एरव्‍ही जास्तीत जास्त २ ते ३ फूट असते. एका वर्षात केस सुमारे ६ इंच वाढतात, म्हणजेच २ वर्षांत १ फूट केस वाढतात. इतकी लांबी गाठण्यासाठी रेनू यांनी ४ ते ६ वर्षे आपल्या केसांची अत्यंत विशेष काळजी घेतली होती. गिनीज बुकमध्ये नाव नोंदवल्यानंतर लोक आता रेनू यांना प्रसिद्ध ॲनिमेशन पात्र ‘रिपुंजल’ (जिला तिच्या लांब केसांसाठी ओळखले जाते) या नावाने हाक मारत आहेत. ‘एक्स’ आणि इन्‍स्टाग्रामवर देश-विदेशातून तिला भरभरून शुभेच्छा मिळत आहेत. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये रेनू आपले लांब, काळेभोर केस विंचरताना आणि बांधताना दिसत आहे. लोक आश्चर्यचकित होऊन मेसेज करत आहेत. काहीजण ‘हे कसे केले, आम्हालाही सांगा,’ असे विचारत आहेत. तर, अनेकजण कमेंटस्‌मध्ये रिपुंजलचे स्टिकर्स आणि GIF पोस्ट करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT