युरिक अ‍ॅसिड नियंत्रण आहार. Pudhari File Photo
विश्वसंचार

‘या’ आहारामुळे युरिक अ‍ॅसिड राहते नियंत्रणात

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. त्यापैकी एक आहे, युरिक अ‍ॅसिड वाढणे. ‘युरिक अ‍ॅसिड’ हा एक नैसर्गिक पदार्थ आहे, जो शरीरात निर्माण होतो. मात्र, जेव्हा त्याची पातळी जास्त होते, तेव्हा ते सांधे दुखणे, गाऊट आणि इतर अनेक आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरते. विशेषतः तरुण पिढी, जी फास्ट फूड आणि चुकीच्या आहार सवयींमुळे आरोग्याच्या समस्या भोगत आहे, त्यांच्यासाठी ही समस्या म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. यामुळे योग्य आहार आणि नियंत्रण आवश्यक आहे. तज्ज्ञांनी काही प्रभावी खाद्यपदार्थांची माहिती दिली आहे, जे शरीरातील युरिक अ‍ॅसिड नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

चेरी हे युरिक अ‍ॅसिड नियंत्रणासाठी अत्यंत फायदेशीर

चेरी हे फळ युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. चेरीमध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंटस्मुळे शरीरातील सूज आणि जळजळ कमी होते. त्याचबरोबर चेरीमधील फ्लेव्होनॉयडस् युरिक अ‍ॅसिडच्या पातळीला स्थिर ठेवतात. नियमितपणे चेरीचे सेवन केल्याने गाऊटचा त्रास कमी होण्यास मदत होते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंटस् भरपूर प्रमाणात असतात. लिंबूचे नियमित सेवन केल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते, तसेच युरिक अ‍ॅसिडची पातळीदेखील नियंत्रित होते. गाजर उच्च फायबरयुक्त असते, जे युरिक अ‍ॅसिड कमी करण्यास प्रभावी ठरते. गाजरात असलेल्या अँटिऑक्सिडंटस्मुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात व शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. पालक, मेथी, कोथिंबीर या हिरव्या पालेभाज्यांमध्ये खनिज पदार्थ आणि अँटिऑक्सिडंटस् भरपूर असतात, जे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. या भाज्या नियमित आहारात घेतल्याने युरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रणात राहते व सांधे दुखण्याचे त्रास कमी होतात. बोरांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, जे शरीरातील जळजळ कमी करण्यास आणि युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यास मदत करते. ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडस्मुळेही सांधे दुखणे व जळजळ कमी होते. ओमेगा-3 युक्त मासे, जसे की सॅल्मन, मॅकेरेल हे मासे नियमित आहारात घेतल्याने युरिक अ‍ॅसिड नियंत्रित ठेवता येते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT