विश्वसंचार

जमिनीखाली घरे असलेले अनोखे गाव

Arun Patil

लंडन : जगात अनेक अनोखी गावं आहेत जिथे अनोखी घरे पाहायला मिळतात. इराणमधील पलांगन गावात डोंगरांवर गुहांसारखी व दाटीवाटीने उभी असलेली अनोखी घरे पाहायला मिळतात. ट्यूनिशियामध्येही असेच एक गाव आहे. तेथील दजेबेल दाहर परिसरात आजही लोक शंभर वर्षांपूर्वीच्या जुन्या घरांमध्ये राहतात. विशेष म्हणजे ही घरे जमिनीवर नसून जमिनीखाली तयार केलेली असतात. या 'भूमिगत' गावाला 'तिज्मा' या नावाने ओळखले जाते.

या जुन्या घरांमध्ये जगण्यासाठी आवश्यक अशा सर्व सुविधाही आहेत. इथे राहणार्‍या जास्तीत जास्त लोकांची शेती आजुबाजूला आहे. त्यामुळे ते इथेच राहतात व हे ठिकाण सोडून शहरात जात नाहीत. अर्थात गावातील काही लोकांनी शहराची वाटही धरलेली आहे; पण इथे राहणार्‍या लोकांचे म्हणणे आहे की त्यांचे येथील जमिनीवर आणि संस्कृतीवर प्रेम आहे. या अनोख्या घरांना पाहण्यासाठी अनेक पर्यटकही गावात येत असतात. जमिनीखाली अशी घरे तयार करण्याचे कारण म्हणजे या परिसरातील उष्ण हवा. जमिनीखाली अशी घरे असल्याने ती थंड राहतात व उष्ण हवेचा त्रास होत नाही. ही घरे अशा पद्धतीने बांधलेली आहेत की हवा खेळती राहावी!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT