विश्वसंचार

मादागास्करच्या गुहेत सापडले अनोखे भित्तीचित्र

Arun Patil

वॉशिंग्टन : संशोधकांनी प्रागैतिहासिक काळातील एका भित्तीचित्राचा शोध लावला आहे. गुहेतील शिळेवर रंगवलेले हे चित्र पश्चिम मादागास्करमधील अँड्रियामॅमेलो गुहेत आढळले. विशेष म्हणजे हे चित्र प्राचीन इजिप्त आणि बोर्नियोमधील संबंधांचेही संकेत देणारे आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे.

या चित्रामध्ये निसर्गाचा मनुष्य व अन्य पशुपक्ष्यांशी असलेला संबंध दर्शवलेला आहे. मानवासारख्या तसेच प्राण्यांसारख्या आकृत्या यामध्ये आहेत. एका बेटावर या आकृत्या उभ्या असलेले दर्शवले आहे. मादागास्करमध्ये आतापर्यंत अतिशय कमी गुंफाचित्रे सापडलेली आहेत.

आता या गुंफाचित्रातून अनेक वैशिष्ट्ये समोर आली आहेत. त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा सांस्कृतिक संबंधांचीही बाब समोर आली. विशेष म्हणजे यामधील काही दृश्ये ही इसवी सन पूर्व 300 ते इसवी सनपूर्व 30 या काळातील टॉलेमिक काळातील इजिप्तशी संबंध दर्शवणारे आहेत. तसेच अन्य काही चिन्हे व लिखाण हे इथिओपियन व आफ्रा-अरब जगताशी संबंध दर्शवणारे आहेत. या गुंफाचित्राची शैली बोर्नियोच्या शैलीशी जुळणारी आहे. यावरून येथील लोकांचा बोर्नियोशी असलेला प्राचीन काळातील दूरवरचा संबंध दिसून येतो.

SCROLL FOR NEXT