seahorse reproduction | ‘हा’ जगातील असा एकमेव नर, जो देतो बाळांना जन्म! 
विश्वसंचार

seahorse reproduction | ‘हा’ जगातील असा एकमेव नर, जो देतो बाळांना जन्म!

निसर्गाचा चमत्कार! ‘सीहॉर्स’ समुद्री प्राणी

पुढारी वृत्तसेवा

लंडन : सामान्यतः सर्वच सस्तन प्राणी आणि जीवांमध्ये मादी गर्भधारणा करते आणि बाळाला जन्म देते. मात्र, समुद्राच्या खोल निळ्या पाण्यात वावरणारा सीहॉर्स निसर्गाच्या या नियमाला छेद देतो. सीहॉर्समध्ये मादी नाही, तर नर (मेल) गर्भवती होतो आणि प्रसूती वेदना सहन करून पिलांना जन्म देतो. सीहॉर्सची प्रजनन प्रक्रिया अत्यंत रंजक आहे. ही प्रक्रिया एका विशेष डान्सने सुरू होते, ज्याला कोर्टशिप डान्स म्हणतात. नर आणि मादी तासन्तास एकमेकांच्या शेपटीत शेपटी गुंफून नृत्य करतात. यानंतर अंडांचे हस्तांतरण होते, म्हणजेच मादी तिची अंडी नराच्या पोटावर असलेल्या एका विशेष पिशवीत ( ब्रूड पाऊच) सोडून देते.

अंडी पिशवीत पोहोचताच नर त्यांचे फलन करतो आणि पुढील संगोपन नराच्या शरीरातच सुरू होते. नराच्या या पिशवीत रक्ताभिसरण प्रक्रिया सक्रिय होते, जी पिलांना ऑक्सिजन आणि आवश्यक पोषण पुरवते. ही प्रक्रिया सस्तन प्राण्यांच्या प्लासेन्टा प्रमाणेच कार्य करते. प्रजातीनुसार 10 दिवस ते 6 आठवड्यांच्या गर्भधारणेनंतर, नर प्रसूती वेदना सहन करतो आणि शेकडो पिलांना जन्म देतो. निसर्गाची ही अनोखी व्यवस्था सीहॉर्सला प्राणीजगतातील सर्वात वेगळा आणि आश्चर्यकारक जीव ठरवते. जिथे बाप केवळ रक्षणकर्ता नसून प्रत्यक्ष जन्मदाता देखील असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT