विश्वसंचार

नवरा शोधतेय की, व्हिडीओ एडिटर? रिलस्टारच्या लग्नाची अनोखी जाहिरात

Arun Patil

लखनौ : आपले लग्न जुळावे, यासाठी अनेकजण विविध माध्यमांतून प्रयत्न करत असतात. काहीजण जाहिरातीही देतात. लग्नाच्या जाहिराती या सहसा वराला किंवा वधूला काय हवे आहे हे सांगत असतात. या पार्श्वभूमीवर, सध्या व्हायरल होणार्‍या एका मॉर्डन जाहिरातीमधील मुलीच्या अपेक्षा पाहून अनेकांनी डोक्यावर हात मारला असणार यात शंका नाही.

सोशल मीडियावर वर्तमानपत्राची एक वैवाहिक जाहिरात व्हायरल होत असून ती पाहिल्यानंतर लोक म्हणत आहेत की, संबंधित मुलगी वराच्या शोधात आहे किंवा त्याला नोकरीची ऑफर देत आहे? या जाहिरातीत म्हटले आहे, माझे नाव रिया. मी स्वतःसाठी योग्य जोडीदार शोधत आहे. मुलाने कॅमेर्‍याला घाबरू नये. तो रिलेशनशिप या विषयावर रील बनवणारा हवा. तसेच, त्याला ट्रेंडिंग गाण्यावर कॉन्टेंट कसा तयार करावा हे माहीत असले पाहिजे. मात्र, एकत्र कुटुंबात राहणारा मुलगा नको. तसेच भेटायला येण्याआधी त्याने अ‍ॅमेझॉन मिनी टीव्हीवर 'हाफ लव्ह हाफ अरेंज' बघून येणे आवश्यक आहे.

खेरीज त्याला प्रीमियर प्रो माहीत असले पाहिजे. त्यामुळे तो मी तयार केलेले रील/व्लॉग एडिट करूशकेल. या अटी तरुणीने लग्नाच्या जाहिरातीमध्ये ठेवल्या आहेत. कदाचित ही आतापर्यंतची सर्वात अनोखी वैवाहिक जाहिरात आहे, असे म्हणत आयुषी गुप्ता नावाच्या युजरने ती पोस्ट केली होती. ही पोस्ट लिहीपर्यंत या पोस्टला जवळपास एक लाख व्ह्यूज आणि आठ हजार हजार लाईक्स मिळाले आहेत. तसेच शेकडो युजर्सनी कमेंट केल्या आहेत. एका युजरने हे सगळे मेंदूला झिणझिण्या आणणारे असल्याची प्रतिक्रिया व्यक्तकेली असून दुसर्‍या युजरने, मी यासाठी प्रबळ दावेदार असल्याची टिपण्णी केली आहे. आणखी एका युजरने ही नोकरीची जाहिरात आहे की लग्नाची? असा थेट प्रश्नच विचारला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT