Noam Shazier & John Jumper | दोन व्यक्तींनी नोकरी बदलली आणि शेअर बाजार कोसळला! 
विश्वसंचार

Noam Shazier & John Jumper | दोन व्यक्तींनी नोकरी बदलली आणि शेअर बाजार कोसळला!

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : सध्याचा जमाना हा 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' म्हणजेच 'एआय'चा (कृत्रिम बुद्धिमत्ता) आहे. अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया आणि भारत यांसारखे प्रत्येक देश 'एआय'वर अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत. गुंतवणूकदारांचा असाही विश्वास होता की, भविष्यात 'एआय' कंपन्या सर्वाधिक नफा कमावतील. याच आशेवर टेक कंपन्यांचे शेअर्स सातत्याने वाढत होते. पण २२ जून रोजी अचानक असे काही घडले, ज्यामुळे संपूर्ण एआय जगाचे पितळ उघड झाले. या घसरणीमुळे ॲलन मस्कसुद्धा अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर फेकले गेले. या दोन व्यक्ती म्हणजे नोआम शझीर आणि जॉन जम्पर.

एकाच दिवसात जगातील सर्वात मोठ्या एआय कंपन्यांचे शेअर्स कोसळले. 'NVIDIA'चे अंदाजे २०० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. ॲमेझॉनचे शेअर्स अंदाजे ५ टक्क्यांनी घसरले. मेटाचे शेअर्स अंदाजे २ टक्क्यांनी खाली आले. गुगलची मूळ कंपनी, अल्फाबेटच्या शेअर्समध्येही मोठी विक्री झाली, ज्यामुळे तिच्या बाजार भांडवलातून अंदाजे २७० अब्ज डॉलर्स कमी झाले. जागतिक शेअर बाजारांमध्ये अस्वस्थता पसरली. प्रश्न केवळ शेअर्स का घसरले हा नव्हता; पण असे नेमके काय घडले, ज्यामुळे इतक्या मोठ्या हालचाली झाल्या.

सर्वात आश्चर्यकारक गोष्ट ही होती की, कोणतेही मोठे युद्ध झाले नाही, व्याजदरात कोणताही मोठा बदल झाला नाही आणि एआयवर कोणतीही सरकारी बंदी घालण्यात आली नाही. पण जेव्हा खरे कारण उघड झाले, तेव्हा संपूर्ण जगाला धक्का बसला. तर याची सुरुवात होते ती १६ जून रोजी झाली. गुगलचे सर्वात प्रतिभावान एआय संशोधक, नोआम शझीर यांनी कंपनी सोडून ओपन एआयमध्ये सामील होण्याचा आपला निर्णय जाहीर केला. नोआम शझीर हे तेच शास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी २०१७ च्या महत्त्वपूर्ण 'ट्रान्स्फॉर्मर' शोधनिबंधाचे सह-लेखन केले होते.

हे ट्रान्स्फॉर्मर तंत्रज्ञान आजच्या चॅटजीपीटी, जेमिनी, क्लाऊड आणि जवळपास सर्व प्रगत एआय मॉडेल्सचा पाया मानले जाते. यानंतर १९ जून रोजी गुगल डीपमाइंडचे प्रख्यात शास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते जॉन जम्पर यांनीही गुगल सोडून अँथ्रोपिकमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यामुळे २२ जून रोजी बाजार उघडताच गुंतवणूकदारांनी अल्फाबेटचे शेअर्स विकायला सुरुवात केली. काही तासांतच इंट्राडे ट्रेडिंगमध्ये कंपनीच्या शेअरमध्ये अंदाजे ७.२ टक्क्यांची घसरण झाली, जी एका वर्षापेक्षा जास्त काळातील सर्वात मोठी घसरण होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT