विश्वसंचार

ऑस्ट्रेलियात दोघांनी खोदून काढले 1 कोटी 87 लाखांचे सोने

Pudhari News

कॅनबेरा : दक्षिण ऑस्ट्रेलियात उत्खनन करणार्‍या एका जोडगोळीने तब्बल 1 कोटी 87 लाख रुपये किमतीचे सोने बाहेर काढले आहे. ब—ॅट शॅनॉन आणि एथन वेस्ट असे या दोघांचे नाव आहे. व्हिक्टोरिया राज्यातील टार्नागुल्ला शहराजवळ खोदकामात त्यांना इतके सोने आढळले.

या दोघांच्या या खोदकामाची माहिती प्रसिद्ध टी.व्ही. शो 'ऑस्ट्रेलियन गोल्ड हंटर्स'मध्ये देण्यात आली आहे. हा कार्यक्रम नुकताच प्रसारित झाला. या जोडीने मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने जमिनीतील दडलेल्या सोन्याचा छडा लावला आणि तिथे खोदकाम सुरू केले. सोने बाहेर काढण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण करून त्याचेही टी.व्ही.वर प्रसारण करण्यात आले. एथन वेस्ट याने याबाबत सांगितले, हा निश्चितच आमचा सर्वात महत्त्वाचा शोध आहे. एकाच दिवसात सोन्याचा इतका मोठा साठा आम्हाला मिळाला. 2019 मध्येही एका ऑस्ट्रेलियन व्यक्तीने मेटल डिटेक्टरचा वापर करून 51 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे सोने शोधले होते. 

SCROLL FOR NEXT