File Photo
विश्वसंचार

‘त्या’ जमातीत अद्यापही ‘स्मोक ममीफिकेशन’ची परंपरा!

पुढारी वृत्तसेवा

पोर्ट मोर्सेबी : जगभरात अनेक धर्म आहेत आणि प्रत्येक धर्माच्या स्वतःच्या परंपरा आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची परंपरा म्हणजे मृत्यूनंतर शरीराचे दहन करणे. मृतदेह शेवटच्या प्रवासाला नेण्याची पद्धत प्रत्येक धर्मात वेगळी आहे. उदाहरणार्थ, हिंदू धर्मात जेव्हा कोणाचा मृत्यू होतो तेव्हा त्यांचे शरीर जाळले जाते. याला अग्नी संस्कार म्हणतात. दुसरीकडे, जेव्हा लहान मुलांचा मृत्यू होतो, तेव्हा त्यांना नद्यांमध्ये विसर्जित करण्याची परंपरा आहे. अशा प्रकारे, प्रत्येक धर्माचे स्वतःचे नियम आहेत, जे त्यांच्या श्रद्धा आणि परंपरांवर आधारित आहेत. जगात अनेक जमाती आहेत, ज्या त्यांच्या अनोख्या आणि विचित्र प्रथांसाठी ओळखल्या जातात. पापुआ न्यू गिनीमध्येही अशा काही परंपरा आहेत, ज्या खूप अनोख्या वाटतात आणि सामान्य माणसाच्या विचारांच्या पलीकडच्या आहेत. या प्रथा या जमातींची खास ओळख आहेत आणि या प्रथांमुळेच ते थोडेसे वेगळे ठरतात.

आफ्रिकन देश पापुआ न्यू गिनीमध्ये अंत्यसंस्काराची एक अतिशय भीतिदायक परंपरा आहे. ती जगाच्या इतर भागांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. येथे काही जमाती आहेत ज्या मृतदेह जाळत नाहीत किंवा पुरत नाहीत. उलट, या जमातींमध्ये, मृत्यूनंतर मृतदेह बांबूवर उंच ठिकाणी किंवा डोंगराळ भागात टांगला जातो, जेणेकरून तो त्यांच्या पूर्वजांची आठवण म्हणून पुढील पिढीसाठी जतन केला जाईल.

येथील लोकांचा असा विश्वास आहे की, त्यांचे पूर्वज त्यांचे रक्षण करतात आणि त्यांना आशीर्वाद देतात. त्यामुळे, मृतदेह जतन करणे हे त्यांच्यासाठी आदर आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. हे मृतदेह त्यांच्यासाठी केवळ एक स्मरणिका नाहीत, तर त्यांच्या इतिहास आणि संस्कृतीचा एक भाग आहेत. ही परंपरा या जमातीसाठी त्यांची ओळख आणि वारसा जतन करण्याचा एक मार्ग आहे. पापुआ न्यू गिनीची ही अनोखी परंपरा जगभरातील पर्यटक आणि संशोधकांना आकर्षित करते. लोक येथे संस्कृती आणि परंपरा जवळून समजून घेण्यासाठी येतात. तथापि, आधुनिक काळात या परंपरांमध्ये काही बदल झाले आहेत. आता काही ठिकाणी दफन आणि जाळण्याची प्रक्रियाही अवलंबली जात आहे. पण, ‘स्मोक ममीफिकेशन’ची ही परंपरा अजूनही काही जमातींमध्ये जिवंत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT