विश्वसंचार

‘सोन्याच्या’ पानांचा वर्षाव करणारे झाड!

Pudhari News

बीजिंग : दसर्‍याला आपण आपट्याची पाने एकमेकांना देऊन 'सोने घ्या सोन्यासारखे राहा' अशा शुभेच्छा देत असतो. अर्थातच हे 'सोने' प्रतिकात्मक असते. एक झाड मात्र खरोखरच सोने वाटावे अशा पानांनी डवरलेले आहे. 1400 वर्षांपूर्वीच्या या झाडाला 'गिंकगो' असे नाव असून ते चीनमध्ये आहे.

एका ट्विटर यूजरने या झाडाची छायाचित्रे शेअर केली आहेत. त्याबरोबर दिलेल्या कॅप्शननुसार हे झाड चौदाशे वर्षांपूर्वीचे आहे. आपल्याकडे 'गोल्डन शॉवर'चे झाड जसे पिवळेधमक दिसते तसेच हे झाड आहे. या झाडाच्या सोनेरी, पिवळ्या पानांचा अक्षरशः सडाच सभोवती पडलेला असतो. त्यामुळे जणू काही हे झाड सोन्याचा वर्षाव करीत आहे असेच दिसते. खरे सोने म्हणजे निसर्गच आहे असा जणू मोलाचा संदेशच हे झाड देत आहे. सोशल मीडियात अनेकांनी या झाडाचे हे फोटो पसंद केले व त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT