Taylor Swift Wedding | टेलर स्विफ्टच्या लग्नाच्या ठिकाणचा ‘कचरा’ १.२ लाखांना विकला!  
विश्वसंचार

Taylor Swift Wedding | टेलर स्विफ्टच्या लग्नाच्या ठिकाणचा ‘कचरा’ १.२ लाखांना विकला!

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क : जगभरात चाहते आपल्या लाडक्या ताऱ्यांसाठी काय करतील याचा नेम नाही; पण यावेळी एक अतिशय अजब प्रकार समोर आला आहे. अमेरिकन पॉप स्टार टेलर स्विफ्ट आणि एनएफएल खेळाडू ट्रॅव्हिस केल्स यांच्या विवाह सोहळ्यानंतर, त्यांच्या वेडिंग वेन्यूच्या (लग्नाच्या ठिकाणाच्या) बाहेर पडलेला कचराही लोकांनी विकत घेतला आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे न्यूयॉर्कच्या एका कलाकाराने हाच कचरा विकून तब्बल १.२ लाख रुपयांची कमाई केली आहे.

'एएफपी' च्या रिपोर्टनुसार, टेलर स्विफ्ट आणि ट्रॅव्हिस केल्स यांनी जिथे लग्न केले, त्या 'मॅडिसन स्क्वेअर गार्डन'च्या बाहेरून ३ जुलै रोजी जस्टिन गिग्नॅक नावाच्या एका कलाकाराने विविध प्रकारचा कचरा गोळा केला. त्या वेळी हजारो चाहते लग्नानंतर टेलर आणि ट्रॅव्हिसची एक झलक पाहण्यासाठी वेन्यूबाहेर जमले होते. कलाकार जस्टिनला वेन्यूबाहेरून बाटल्यांची टोपणं, सिगारेटचे थोटके, पोलिसांची वॉर्निंग टेप, स्ट्रॉ, प्लास्टिकची भांडी, एक एअरपॉड, रिंग पॉप कॅंडी आणि एक ओव्हुलेशन किट सारख्या वस्तू मिळाल्या. यावर त्याने उपरोधाने म्हटले की, ‘‘कदाचित हे या नवविवाहित जोडप्यासाठी काहीतरी मेनिफेस्ट करत आहे.’’

जस्टिनने या सर्व वस्तूंना छोट्या छोट्या पारदर्शक प्लास्टिक क्यूबमध्ये (पारदर्शक डब्यांमध्ये) सील केले आणि त्यांना 'कलाकृती' (Sculptures) असे नाव दिले. सील केल्यामुळे त्या कचऱ्यातून दुर्गंधी किंवा गळती होण्याची कोणतीही समस्या नव्हती. यानंतर त्याने प्रत्येक क्यूबची किंमत २५ अमेरिकन डॉलर (सुमारे २,४०० रुपये) ठेवली. त्याने असे जवळपास ५० क्यूब विकले आणि एकूण १,२५० डॉलर्स म्हणजेच सुमारे १ लाख २० हजार रुपये कमावले. रिपोर्टनुसार, जस्टिनने सांगितले की, टेलर स्विफ्टचे अनेक चाहते या लग्नाशी जोडलेली कोणतीही आठवण आपल्याकडे ठेवू इच्छित होते. याच कारणामुळे ऑनलाईन विक्री सुरू झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत सर्वच्या सर्व क्यूब विकले गेले. खरेदीदार जवळपास ३० वेगवेगळ्या देशांमधील होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT